गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना अनेकजण सोडून जात आहेत. यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला. यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार देखील कोसळले. उद्धव ठाकरे यांना 40 आमदार सोडून गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला.
यानंतर आता युद्धव ठाकरे पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. त्यानंतर राज्यात संभाजी ब्रिगेडने (sambhaji brigade) सेनेसोबत युती केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सेनेला आता मराठा सेवा संघाचा देखील पाठिंबा मिळाला आहे.
यामुळे आता शिवसेनेची ताकद वाढणार आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्यातील युतीनंतर आता संभाजी ब्रिगेडची मातृ संस्था असणाऱ्या मराठा सेवा संघाने पाठिंबा दिल्याने आगामी निवडणुकीत याचा नक्कीच फायदा होणार आहे.
कर्करोगावर पहिली स्वदेशी लस तयार सीरम इन्स्टिट्यूट करणार लॉन्च
दरम्यानमराठा सेवा संघाची देखील मोठी व्याप्ती आहे. त्यांचे राज्यभर एक कोटी सभासद तर 36 वेगवेगळे कक्ष आहेत. या सर्व कक्षात फेरबदल करण्यात येणार आहेत. यामुळे शिवसेनेला याचा फायदा होणार आहे.
सिल्वर ओक!! शरद पवार यांच्या बाबतीत उलगडणार अनेक किस्से, पुस्तकाचे प्रकाशन..
पुढील काळात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीला मदत करून राजकीय सत्तेपर्यंत पोहोचण्याचा मराठा सेवा संघाचा प्रयत्न असणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेला याचा किती फायदा होणार हे लवकरच समजेल.
महत्वाच्या बातम्या;
केजरीवाल यांनी विश्वासदर्शक मांडला आणि विरोधी आमदार पळाले, एकही आमदार फुटला नाही...
धक्कादायक! कमी गुण दिल्याने विद्यार्थ्यांची शिक्षकांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल..
गाई म्हशी असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार दीड लाख रुपये, वाचा काय आहे योजना
Share your comments