ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्यासाठी असलेल्या विविध शासनाच्या योजनांचा लाभ मिळवा. यासाठी अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नासिक या जिल्ह्यांमध्ये उभारी या नावाखाली उपक्रम राबवणार आहोत. या उपक्रमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना हातभार लावण्याची आणि आत्मनिर्भर बनवण्याचा कार्यक्रम मागील दोन ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यामध्ये अशाप्रकारच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील प्रमुख कमावती व्यक्ती गेल्यानंतर जो कुटुंबावर आघात होतो, कुटुंबाची दुर्दशा होत असते. अशाप्रकारच्या कठीण काळातही संबंधित कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये जवळजवळ १३४७ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जवळ-जवळ आतापर्यंत ५४१ कुटुंबांना नाशिक जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना आवश्यक असणार्या बाबींची माहिती करून नोंद घेतली आहे.
अशा कुटुंबांमध्ये मुलांच्या शिक्षणाची, मुलीच्या विवाहाची समस्या, बरेच ठिकाणी जमिनीचे बाबतीतही समस्या आहेत या सगळ्या समस्यांची नोंद करून घेण्यात आले आहे. या सगळ्या अडलेल्या समस्यांवर विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यवाही करतील. अशा कुटुंबांना विविध योजनांचा लाभ देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न उभारी करणार आहे.
Share your comments