मोदी सरकारने पाच वर्षापूर्वी नोटबंदी केल्यानंतर दोन हजार रुपयाची नोट तत्परतेने चलनात आणली गेली होती. परंतु आता या नोटा बाजारातून गायब झाले आहेत. केंद्र सरकारच्या माहितीनुसार सध्या दोन हजार रुपयांच्या केवळ 1.75 टक्के चा नोटा चलनात आहेत
मागच्या साडेतीन वर्षांपासून दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आलेली आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा छपाई ही 2018 या वर्षापासून बंद करण्यात आली असल्याने चलनातून या नोटा चा वापर कमी झालेला दिसून येत आहे.
याबाबतीत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, 26 नोव्हेंबर 2021 रोजी दोन हजार रुपयांच्या 223.3 कोटी नोटा चलनात असल्याची नोंद आहे.
हा आकडा 31 मार्च 2018 रोजी 336.3 कोटी म्हणजेच एन आय सी च्या 37.26 टक्के एवढा होता. 2018 या वर्षापासूननोटा छापखाना कडेया नोटांच्या छपाईसाठी कोणत्याही प्रकारच्या ऑर्डर देण्यात आली नाही, असे चौधरी यांनी सांगितले.
याबाबतीत नोटांची छपाई बाबत केंद्र सरकारकडून आरबीआय सोबत चर्चा करण्यात येते. जनतेची व्यावहारिक मागणी ज्या प्रमाणे असेल त्यानुसार ठराविक नोटांचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येतो.
Share your comments