सध्या राज्यात उसाचा गळीत हंगाम सुरु आहे. असे असताना अनेक घटना समोर येत आहेत. आता मिरज येथे दोनशे एकर ऊस शेतीला भीषण आग लागली. यामध्ये शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. यामुळे एकच पळापळ बघायला मिळाली. ढवळी येथे ही घटना घडली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वानी शर्तीचे प्रयत्न केले मात्र मोठ्या प्रमाणावर ऊस जळाला आहे. असे असताना शेतात अनेकांचे गाईचे गोठे देखील होते. त्यांना वाचवण्यात मात्र यश आले आहे. अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी वेळीच घरातील नागरिकांना व गोठ्यातील जनावरांना बाहेर काढले. यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. दरम्यान, ढवळी-वड्डी कुटवाड रस्ता येथील काही शेतकऱ्यांच्या ऊस शेतीला आग लागली. काही क्षणातच ही आग शेजारील अन्य उसाच्या शेतापर्यंत पोहोचली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र या आगीची तीव्रता काही वेळातच मोठ्या प्रमाणावर पसरली. यामुळे ती आटोक्यात आणणे अवघड झाले. दोन तासात बघता बघता परिसरातील सुमारे दोनशे एकर ऊस शेतीला आगीने भस्मसात केले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.
यावेळी अग्निशमन दल फौजफाट्यासह घटनास्थळी त्वरित दाखल झाले. आग लागलेल्या परिसरात काही नागरिकांची घरे व जनावरांचे गोठे आहेत. शेतानजीक त्यांचे वास्तव्य असल्याने त्यांना आगीचा धोका होता. यामुळे अनेकांचे टेन्शन वाढले होते. यामुळे अग्निशमन दलाचे जवान लिंगप्पा कांबळे अमोल गडदे व तानाजी पाटील यांनी घरातील सर्व नागरिक व गोठ्यातील जनावरांना बाहेर काढले. नाहीतर मोठी घटना घडली असती. परिसरात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. याठिकाणी एकाला एक लागून असे उसाचे क्षेत्र आहे.
अनेकांनी आपल्या घराशेजारील उसाच्या शेतातील आग शमविली. यामुळे घरे व गोठे सुरक्षित राहिले. याठिकाणी जनावरांची देखील संख्या मोठी होती. दरम्यान, राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड झाली आहे. यामुळे अनेकांचे ऊस अजूनही गेले नाहीत. उसाला तुरे आले मात्र अजूनही तोड आली नाही. यामुळे वजनात देखील घट होणार आहे. यामुळे सध्या शेतकरी चिंतेत आहे. आता आपला ऊस घालवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे.
Share your comments