1. बातम्या

Breaking : आताची सर्वात मोठी बातमी! राज्यातील दोन जिल्हे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; नागरिक भयभीत

Earthquake: आताची सर्वात मोठी बातमी..! पालघर भूकंपाच्या धक्क्यांनी (Palghar Earthquake News) हादरलं असून संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. बुधवारी पहाटे महाराष्ट्रातील नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. (Earthquake News) भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ इतकी मोजली गेली.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Earthquake

Earthquake

Earthquake : आताची सर्वात मोठी बातमी..! राज्यातील दोन जिल्हे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले आहेत. पालघर आणि नाशिक जिह्यात भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले आहे. पालघर मध्ये आज पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. (Earthquake News) तर बुधवारी पहाटे महाराष्ट्रातील नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. 3.6 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिक भयभीत झाले आहेत. पालघर जिल्ह्याच्या डहाणू तलासरी भागात मागील तीन वर्षांपासून लहान मोठ्या भूकंपाच्या हादऱ्यांचे सत्र सुरूच आहे.

डहाणू, कासा, आंबोली, धानिवरी, उर्से, धुंदलवाडी, घोलवड, तलासरी बोर्डी या परिसरात 3.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

आजच्या दिवशी या राशीच्या लोंकानी जोखीम घेणे टाळा; वाचा तुमचे राशीभविष्य

नाशिकमध्ये भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ इतकी मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पश्चिमेला ८९ किमी अंतरावर आज पहाटे ४.४ च्या सुमारास ३.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे.

ते म्हणाले की, भूकंपाची खोली जमिनीखाली ५ किमी होती. तर यासंबंधी अधिक माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून यामुळे नागरिकांमध्ये मात्र भीती आहे.

मोठी बातमी : 2 दिवसांपासून मोदींना ठार मारण्याच्या धमक्या

English Summary: Two districts of the state were rocked by earthquake tremors Published on: 23 November 2022, 08:46 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters