बऱ्याच दिवसापासून गगनाला गवसणी घालणाऱ्या खाद्यतेलाच्या भावामध्ये मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत असून राष्ट्रीय बाजारामध्ये खाद्य तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्याचा परिणाम भारतातील खाद्यतेल दर उतरण्यावर झाला आहे. त्यामुळे भारतामध्ये खाद्य तेलाचे दर चांगलेच घसरले असून खाद्यतेलाच्या प्रति ढगामागे 300 ते 700 रुपयांची घसरण झाली आहे आहे.
या पार्श्वभूमीवर आपण किरकोळ बाजाराचा विचार केला तर खाद्यतेल प्रतिलिटर 20 ते 40 रुपयांनी स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा:काय सांगता ! कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण ; पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त? वाचा..
काही दिवसांअगोदर गगनाला पोहोचलेले खाद्य तेलाच्या दर कमी व्हावेत यासाठी सरकारकडून देखील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
सोयाबीन, पाम तेल, सूर्यफूल तसेच सारखी देण्याच्या किमतींमध्ये मोठी घट झाली आहे. पामतेल 170 रुपयांवरून 125 रुपये किलो झाली असून सोयाबीन तेल 180 रुपयांवरून 150 रुपये पर्यंत खाली घसरले आहे.
खोबरेल 260 वरून 240 व रिफाइंड तेल किलोमागे दहा रुपयांनी उतरले आहे. खाद्य तेलाच्या बाबतीत थोडाफार दिलासा मिळताना दिसत असताना मात्र इतर वस्तूंच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये पेट्रोल आणि डिझेल सध्या परिस्थिती स्थिर आहे
परंतु सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात वाढ सुरूच आहे. त्यामुळे वाहतूक खर्च देखील वाढला असून वाहतूक खर्च वाढल्याने सर्व वस्तूंचे दरात वाढ झाली आहे. मागे काही दिवस आगोदरच एलपीजी गॅस सिलेंडर ने एक हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
नक्की वाचा:दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा, एकमेकांवर बॉम्ब फेकले, राजकीय वातावरण तापले..
Share your comments