देशातून गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर जगातील गव्हाचे संकट आणखी वाढले आहे.रशिया आणि युक्रेन यांच्या सुरू असलेल्या या युद्धावर अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही
ज्या देशांमध्ये रशिया आणि विक्रीमधून गहू पुरवठा केला जात होता,त्या देशांमध्ये याचा थेट परिणाम झाला आहे.कारण आता त्या देशांमध्ये गव्हाचा पुरवठा होत नाही,अशा परिस्थितीत आणला संकट निर्माण झाल्यामुळे अनेक देश भारताकडून गव्हाचा पुरवठा करण्याची मागणी करत आहेत.
पण या सगळ्यात एक असा देश आहे ज्याने भारताचा गहू खराब असण्याचे कारण पुढे करत गहू परत केला आहे.तसे पाहायला गेले तर,गव्हाच्या टंचाईच्या काळात भारताने तुर्कस्तान ला गव्हाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात केला होता.
मात्र तुर्कस्तानचे भारताचा गहू खराब असल्याचे सांगत परत केला.मात्र जगामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे,त्या पार्श्वभूमीवर ही गहू परत करण्याची चूक इजिप्त या देशाने केले नाही आणि तुर्की ने परत पाठवलेला गहू इजिप्तने खरेदी केला.
म्हणजेच एका देशाने खराब म्हणत परत केले व दुसरा देशाने या गव्हाला खरेदी केले यावरून जगातील अन्नधान्याची आणि प्रामुख्याने गव्हाची टंचाईची समस्या किती गंभीर आहे हे लक्षात येते.
नक्की वाचा:Breaking: भारताच्या गव्हात आढळला व्हायरस; 'या' देशाने परत केला भारतीय गहू
61 हजार 500 टन गहू इजिप्तला मागच्या महिन्यात पाठवला
मीडिया नुसार, जेव्हा तुर्की ने भारतीय गहू खराब म्हणून परत केला तेव्हा इजिप्तने तो विकत घेतला. यानंतर भारताने तो गहू इजिप्तला पाठवला आहे. रशिया युक्रेन त्यामुळे गहू आणि इतर खाद्य पदार्थ इजिप्तमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे देशात अन्नधान्याचे संकट निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर इजिप्तने भारताकडे मदत मागितली होती.
इजिप्त वरील हे अन्नधान्याच्या संकट पाहता भारतातील बंदी हटवून इजिप्तला गहू निर्यात करण्याचा निर्णय घेतला..यानंतर भारताने गेल्या महिन्यातच इजिप्तला 61 हजार 500 टन गहू निर्यात केला होता. पण जरीही खेप इजिप्तसाठी अपुरी होती परंतु त्यामुळे इजिप्त नेही तुर्की ने परत केलेला गहू खरेदी केला.
नक्की वाचा:शेतकरी बंधूंनो! कपाशी लावली गेली परंतु सुरुवातीला पाऊस आहे कमी तर नका करू काळजी कारण….
नक्की वाचा:फँटॅस्टिक बिझनेस आयडिया: कागदापासून बनवा 'या'निरनिराळ्या वस्तू, कमवा आरामात लाखोंचा नफा
Share your comments