1. बातम्या

गृहिणींसाठी घरबसल्या पैसे कमावण्याच्या जबरजस्त संधी; 'या' सात व्यवसायातून कमवा बक्कळ पैसा

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे असंख्य पुरूष असो की स्त्रीया नोकरीपेक्षा छोटे मोठे स्वतःचे उद्योग करण्याकडे वळत आहेत. त्यामुळे घरच्या कामातून सवड काढून घरीच काहीतरी काम मिळावे अशी अनेक गृहिणींची भावना असते. अशा कामाच्या शोधात त्या असतात. त्यामुळे महिलांसाठी आम्ही सात व्यवसायाच्या आयडिया घेऊन आलो आहोत. व्यवसाय सुरू करण्यापुर्वी आपण सर्वांनी एक मंत्र काय लक्षात ठेवला पाहिलजे तो म्हणजे कोणतेही काम हे कमी दर्जाचे नसते.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
गृहिणींसाठी घरबसल्या पैसे कमावण्याच्या जबरजस्त संधी

गृहिणींसाठी घरबसल्या पैसे कमावण्याच्या जबरजस्त संधी

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे असंख्य पुरूष असो की स्त्रीया नोकरीपेक्षा छोटे मोठे स्वतःचे उद्योग करण्याकडे वळत आहेत. त्यामुळे घरच्या कामातून सवड काढून घरीच काहीतरी काम मिळावे अशी अनेक गृहिणींची भावना असते.

अशा कामाच्या शोधात त्या असतात. त्यामुळे महिलांसाठी आम्ही सात व्यवसायाच्या आयडिया घेऊन आलो आहोत. व्यवसाय सुरू करण्यापुर्वी आपण सर्वांनी एक मंत्र काय लक्षात ठेवला पाहिलजे तो म्हणजे कोणतेही काम हे कमी दर्जाचे नसते.

फॅशन डिझाइनर

आजकाल फॅशनेबल कपड्यांचा क्रेझ तरुण तरुणींमध्ये वाढलाय. ट्रेडिंग फॅशनचं ज्ञान असणाऱ्या गृहिणींना या बिझिनेसमध्ये चांगली कमाईची संधी आहे. या क्षेत्राशी संबधीत शॉर्ट टर्म कोर्स करून याचे काम सुरू करता येते.

ट्युशन क्लासेस

अनेक जाणकार म्हणतात की, शिकलेले वाया जात नाही. लग्नानंतर तुम्हाला जर नोकरीची संधी मिळाली नाही. तर काही हरकत नाही, तुम्ही घरी शिकवणी घेऊन पैसा कमावू शकतात. गृहिणींचे शिक्षण चांगले झाले असल्यास, शालेय विद्यार्थ्यांची घरघुती शिकवणी घेता येईल. कोव्हिडमुळे सध्या हा व्यवसाय सर्व काळजी घेऊन करणे गरजेचे आहे. यामुळे दरमहा चांगले उत्पन्न येईल आणि लहानग्यांना शिकवण्याचा आनंदही मिळेल.

 

ऑनलाईन सेलिंग

आजकाल इंटरनेटच्या मदतीने नवे आणि जुने सामान विकण्याचा ट्रेंड मार्केटमध्ये जोर धरत आहे. तुम्ही तुमच्या क्रिएटीव्हिटीने बनवलेले सामान जसे की, पेंटिंग्स, डिझायइनर कपडे, पर्स वेगैरे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकू शकता. ऑनलाईन विक्रीसाठी ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडिल इत्यादी प्लॅटफार्मचा विचार करू शकता.

Youtube Video

स्मार्ट गृहिणींसाठी युट्यूब व्हिडिओ हा एक उत्तम कमाईचा पर्याय आहे. तुम्हाला येत असलेले कोणतेही चांगले कौशल्य तुम्ही जगाला शिकवू शकता. किंवा माहितीपर व्हिडिओ शेअर करू शकता. तुमच्या युट्यूब चॅनेलची जसजशी प्रसिद्धी होत जाईल तसतसे युट्यूबकडून तुम्हाला उत्पन्न मिळणे सुरू होईल.

 

ब्लॉगिंग

जर तुम्हाला चांगले लेख लिहण्याची आवड असेल तर तुम्ही ऑनलाईन ब्लॉग सुरू करू शकता. ब्लॉगिंगमध्ये तुमच्या आवडीचे विषय तुम्ही निवडू शकता. खाद्यपदार्थांपासून ते ट्रेक, स्पोर्ट, आर्थिक, सामाजिक राजकीय इत्यादी कोणत्याही विषयांवर ब्लॉगिंग सुरू केल्यास नक्कीच चांगले उत्पन्न सुरू होऊ शकते.

हेही वाचा : डेअरी व्यवसायासाठी सरकार देत आहे अनुदान; ६६ टक्के सब्सिडी घेऊन सुरू करा डेअरी फर्म

ब्युटी पार्लर

तुम्ही तुमच्या कॉलनी किंवा सोसायटीमध्ये महिलांना घरातूनच पार्लर चालवताना पाहिले असेल. विश्वास ठेवा तुमचं काम चांगलं असेल आणि आजुबाजूला राहणाऱ्या स्त्रीयांची संख्या भरपूर असेल तर, तुम्हाला हा व्यवसाय जबरजस्त उत्पन्न देणारा ठरतो.

 

बेबी सेटिंग आणि प्ले वे स्कूल

आज काल नवरा बायको आपल्या करिअरमध्ये गुंतलेले असल्याने घराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. अशातच, त्यांना आपल्या लहान मुलांकडेही लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे असे कपल आपल्या मुलांसाठी चाइल्ड केअर सेंटरच्या शोधात असतात. या संधीचा गृहिणींनी फायदा घ्यायला हवा. बेबी सिटिंग आणि प्ले वे स्कूलचे काम सुरू करून चांगले पैसे कमावता येऊ शकते.

हेही वाचा : पारंपारिक शेतीला मिळाला उत्तम पर्याय; नारळ शेतीतून शेतकऱ्यानं साधली प्रगती

English Summary: Tremendous opportunities for housewives to earn money at home; Make Money From These Seven Businesses Published on: 03 July 2021, 02:34 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters