सध्या कांद्याला दर नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांना खर्च देखील निघत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान त्यांचे होणार आहे. असे असताना एका शेतकऱ्याला 205 किलो कांद्यांच्या विक्रीतून हाती फक्त 8 रुपये आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कर्नाटक (karnataka) राज्यातील गदग (Gadag) जिल्ह्यातील आहे.
कांद्याच्या विक्रीसाठी या शेतकऱ्याने तब्बल 415 किमीचा प्रवास केला आहे. यामुळे शेतकरी नाराज आहेत. या शेतकऱ्याने आपल्या कांद्याला चांगला दर मिळावा यासाठी शेतकऱ्याने 415 किमी दूर असणाऱ्या बंगळुरूच्या बाजारपेठेत विक्रीसाठी कांदा नेला होता.
असे असताना बंगळुरुच्या यशवंतपूर मंडईत 205 किलो कांद्याच्या विक्रीतून शेतकऱ्याला केवळ 8 रुपये 36 पैसे मिळाले. कांद्याला कमी दर मिळाल्यानं हताश झालेल्या शेतकऱ्याने कांदा विक्रीची पावती सोशल मीडियावर टाकली. यामुळे शेतकऱ्यांची खरी परिस्थिती समोर येत आहे.
यामध्ये मालवाहतूक शुल्क 377 रुपये आणि कांदा उचल शुल्क 24 रुपये होते. या सर्वांचा खर्च वजा केल्यावर शेवटी शेतकऱ्याच्या हातात फक्त 8 रुपये 36 पैसे आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी शेती कशी करावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर! बीजिंग, झेंगझोऊमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन
या शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांना यशवंतपूर बाजार समितीत कांदा न विकण्याचे आवाहन केले आहे. गदग आणि उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याबद्दल सावध करण्यासाठी आपण पावती सोशल मीडियावर शेअर केल्याचेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या;
नाशिक येथील १५ व्या कृषीथॉनमध्ये बीकेटीने केले जागतिक दर्जाच्या कृषी उत्पादनांचे अनावरण
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन! इथेनॉलमुळे कारखान्यांची परिस्थिती सुधारणार
ढसाढसा रडत शेतकऱ्यांनी थेट धरले अधिकाऱ्यांचे पाय, जाणून घ्या नेमकं काय घडलं...
Share your comments