दिवसेंदिवस पेट्रोल- डिझेल, गॅस, सीएनजीच्या किंमती वाढत आहेत. त्यापाठोपाठ एसटी महामंडळाच्या भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. डिझेलच्या दरात दरवाढ होत असल्याने त्याचा अतिरिक्त भार एसटीवर पडत आहे. यामुळे हा पडणारा भार कमी करण्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रयत्न होणार आहे.
डिझेलचे दर वाढल्यामुळे एसटीवर महिन्याला सुमारे १२० ते १४० कोटींचा अतिरिक्त भार पडला आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने राज्यातील बहुतांश मार्गावरील बससेवा बंद आहे. यामुळे महामंडळाच्या तिजोरीत अपेक्षित रक्कम येत नाही. दरम्यान, याआधी जून २०१८ मध्ये एसटीने १८ टक्के भाडेवाढ केली होती. आता पुन्हा ही भाडेवाढ होणार असल्याने तिकीट दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
एसटी महामंडळाच्या साधारणत: १६ हजार बसेर राज्यात डिझेलवर धावत आहेत. जेव्हा या सर्व बस धावतात तेव्हा दिवसाला १२ लाख ५०० लीटर डिझेल लागते.
सध्या १० हजार बसेस धावत असून दिवसाला ८ लाख डिझेल लागते. तसेच एसटीच्या एकूण महसुलाच्या ३८ टक्के म्हणजेच ३ ते ४ हजार कोटी रुपये फक्त इंधनावर खर्च होतात, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या साधारणत: १६ हजार बसेर राज्यात डिझेलवर धावत आहेत. जेव्हा या सर्व बस धावतात तेव्हा दिवसाला १२ लाख ५०० लीटर डिझेल लागते. सध्या १० हजार बसेस धावत असून दिवसाला ८ लाख डिझेल लागते. तसेच एसटीच्या एकूण महसुलाच्या ३८ टक्के म्हणजेच ३ ते ४ हजार कोटी रुपये फक्त इंधनावर खर्च होतात, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.
एसटी महामंडळाच्या साधारणत: १६ हजार बसेर राज्यात डिझेलवर धावत आहेत. जेव्हा या सर्व बस धावतात तेव्हा दिवसाला १२ लाख ५०० लीटर डिझेल लागते. सध्या १० हजार बसेस धावत असून दिवसाला ८ लाख डिझेल लागते. तसेच एसटीच्या एकूण महसुलाच्या ३८ टक्के म्हणजेच ३ ते ४ हजार कोटी रुपये फक्त इंधनावर खर्च होतात, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, डिझेल दरवाढीमुळे याचा भार एसटीच्या उत्पानवर पडत आहे. आधीच कमी उत्पन्न आणि खर्चात जास्त वाढ यामुळे एसटी तोड्यात असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच आता इंधनाचे दर शंभरीकडे वाटचाल करत असल्याने एसटीने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केल्याचे सांगितले जात आहे.
Share your comments