1. बातम्या

आता शेतकऱ्यांचा आणि शिवाराचा होणार कायापालट, राज्यातील गावांमध्ये राबवणार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना..

शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा मानला जातो. असे असताना त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अनेकदा अवकाळी, तसेच इतर संकटांचा सामना करावा लागतो. आता राज्य सरकारने एक निर्णय घेतला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत एकूण 5 हजार 142 गावांची निवड करण्यात आली आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
water

water

शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा मानला जातो. असे असताना त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अनेकदा अवकाळी, तसेच इतर संकटांचा सामना करावा लागतो. आता राज्य सरकारने एक निर्णय घेतला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत एकूण 5 हजार 142 गावांची निवड करण्यात आली आहे. या अभियानातून आपल्या राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना (Farmers) विविध कृषी योजनांच्या माध्यमातून सक्षम व उत्पादनक्षम बनविण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येतील, याबाबत कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी माहिती दिली.

यामुळे आता शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यावेळी मंत्री भुसे म्हणाले की, शेतकरी बांधवांना वातवरणातील बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी व शेती व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी पाण्याचा थेंब वाचविणे आवश्यक आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचन व तंत्रज्ञानावर आधारित सूक्ष्म नियोजन तसेच वेळोवेळी गावपातळीवर शेतकऱ्यांना शेतीच्या विविध योजना लाभ मिळावा यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामसभेचही आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांनी याचा फायदा घेण्याचे आवाहन केले गेले आहे.

गावातील छोटे व मोठे बंधारे यांच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. यामुळे दुष्काळी गावांना याची मदत होणार आहे. तसेच पाण्याचा ताळेबंद, शेतीसाठी पाणी, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, पिकांसाठी नवीन तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय आणि शेतकऱ्यांची क्षमता बांधणी या बाबींवर भर देण्यात येणार आहे. शेतकऱ्याचे जीवनमान यामुळे उंचावेल. यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत.

शेतीक्षेत्रात महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी लक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक प्रकल्प गावात कृषिताईचे सातबाऱ्यावर नामनिर्देशन करण्याकरिता कोणतेही पैसे न घेता अर्ज केल्यापासून 15 दिवसांच्या आत उताऱ्यावर नाव लावण्यात येणार आहे. तसेच प्रकल्प समितीमध्ये ग्रामपंचायत कायद्यानुसार सर्व घटकांना पुरेसे प्रतिनिधित्व देण्याबरोबरच महिला 50 टक्के प्रतिनिधीत्व करण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.

यासाठी निवड झालेल्या गावांमध्ये वैयक्तिक लाभासाठीच्या योजनांकरिता 2 हेक्टर पर्यंत जमीन धारकांना 75 टक्के आणि 2.5 हेक्टर जमीनधारकांना 65 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. शेती व्यवसायाबरोबर पुरक व्यवसाय करण्यासाठी, जैविक व सेंद्रीय खतांची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. याबरोबरच योजनांची माहिती व लाभ घेण्याकरीता विविध ॲपही तयार करण्यात आले आहेत, यामुळे आता ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

English Summary: transformation farmers Shivara, Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Yojana implemented villages state .. Published on: 13 March 2022, 12:21 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters