हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषी उपक्रमांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम
परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्या वतीने दि. 6 ऑगस्ट रोजी हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमांतर्गत कोरडवाहु पिकांचे व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम बाभुळगाव व उजळंबा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात आले. कार्यक्रमात मुख्य शास्त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार व डॉ. मदन पेंडके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्या वतीने दि. 6 ऑगस्ट रोजी हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमांतर्गत कोरडवाहु पिकांचे व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम बाभुळगाव व उजळंबा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात आले. कार्यक्रमात मुख्य शास्त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार व डॉ. मदन पेंडके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सद्यपरीस्थितीत पावसाचा पंधरा दिवसाचा खंड पडला असुन सोयाबीन पिकांवर पोटॅशियम नायट्रेट 2 टक्के फवारणी करावी, असा सल्ला मुख्य शास्त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार यांनी दिला तसेच गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले तर शेततळ्यातील पाण्याद्वारे पिकांना संरक्षित सिंचन देण्यासंबंधीची माहिती डॉ. मदन पेंडके यांनी दिली. यावेळी निवडक शेतकयांना पोटॅशियम नायट्रेट व कामगंध सापळ्याचे वाटप करण्यात आले व त्याबद्दलचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना देण्यात आले. सदरिल उपक्रम मागील सात वर्षापासुन परभणी तालुक्यातील बाभुळगाव व उजळंबा या गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येत आहे. बाभुळगाव येथील सरपंच श्री गणेश दळवे, श्री माऊली पारधे, उजळंबा येथील सरपंच श्री मोगले आदीसह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
English Summary: Training Programme done Under National Agriculture Climate Change ProjectPublished on: 10 August 2018, 11:58 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments