प्रादेशिक सेंद्रीय शेती केंद्र नागपूर येथे सेंद्रिय शेतीविषयी प्रशिक्षण

Wednesday, 21 November 2018 07:33 AM


केंद्रीय कृषी
सहकार व शेतकरी कल्‍याण मंत्रालयाअंतर्गत नागपूर येथील प्रादेशिक सेंद्रीय शेती केंद्रातर्फे सेंद्रीय शेतीशेतीवरील संशोधन व्‍यवस्‍थापन जैविक वस्‍तूंचे उत्‍पादनगुणवत्‍ता तपासणीव सेंद्रीय उत्‍पादनाचे विपणन इत्‍यादी संदर्भात 30 दिवसीय अवधीचे दोन प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्‍यासक्रम आयोजित करण्‍यात येणार आहे. या अभ्‍यासक्रमाचा कालावधी  28 नोव्हेंबर ते 27 डिसेंबर 2018 आणि 8 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2019 पर्यंत असेल. प्रशिक्षणाचे स्‍थळ हे प्रादेशिक सेंद्रीय शेती केंद्रअमरावती रोडगोंडखैरीनागपूर-23 आहे.

सदर अभ्‍यासक्रमासाठी कोणत्‍याही शाखेचे पदवीधर पात्र आहेत. या अभ्‍यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना विहित नमुन्‍यात पूर्ण भरलेले अर्ज व आवश्‍यक कागदपत्रासह प्रादेशिक सेंद्रीय शेती केंद्र नागपूर येथे सदर अर्ज दाखल करणे आवश्‍यक आहे अर्जाचा नमुना व सविस्‍तर माहिती या https://ncof.dacnet.nic.in/ संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. या अभ्‍याक्रमासाठी निवास व भोजन व्‍यवस्‍था केंद्रातर्फे करण्‍यात येणार आहे.  प्रवासी भत्‍ता व दैनिक भत्‍ता हा मात्र उमेदवारांना दिला जाणार नाही.

सदर अभ्‍याक्रमाला प्रवेश अर्ज दाखल करण्‍याची अंतिम तारीख 24 नोव्हेंबर 2018 (02.30 वाजेपर्यंत) असून केंद्राचे क्षेत्रीय संचालक डॉ. डी. कुमार (संपर्क क्रमांक-07118-297054) यांनी सेंद्रीय शेती अभ्‍याक्रमाचा लाभ घेण्‍याचे आवाहन उमेदवारांना केले आहे.

Regional Center of Organic Farming Nagpur प्रादेशिक सेंद्रीय शेती केंद्र नागपूर

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.