1. बातम्या

प्रजासत्ताक दिनाचे संचलन झाल्यानंतर होणार ट्रॅक्टर रॅली

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर ६० दिवसांपासून आंदोलन केले जात आहे. हे आंदोलन उद्याही राहणार असून प्रजासत्ताक दिनी राजधानीतील बाह्य वळण रस्त्यावर ट्रॅक्टर परेड काढण्यासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
tractor rally

tractor rally

तीन  कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर ६० दिवसांपासून आंदोलन केले जात आहे. हे आंदोलन उद्याही राहणार असून प्रजासत्ताक दिनी राजधानीतील बाह्य वळण रस्त्यावर ट्रॅक्टर परेड काढण्यासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे.

याविषयीची माहिती शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दर्शन पाल यांनी दिली आहे. राजपथावर  प्रजासत्ताक दिनाचे संचलन झाल्यानंतर ट्रॅक्टर संचलनाला सुरुवात होईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. कृषी कायदे रद्द करण्याच्याल मागणीवर शेतकरी संघटना ठाम असून प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर संचलनातून शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे.

 

शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या आऊटर रिंगरोडवर संचलनाच्या परवानगीची मागणी केली होती. परंतु पोलिसांनी सुरक्षे कारण देत नकार मिळाल्यानंतर सिंघू, टिकरी आणि गाझीपूर अशा तीन सीमांवरुन सुरू होऊन त्याच ठिकाणी परत येण्यास होकार मिळाला. ट्रॅक्टर संचलनासंदर्भात पोलिसांनी झालेल्या वाटाघाटीनंतर संयुक्त किसान मोर्चाचा प्रमुख चेहरा व स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी पत्रकारांशी बोलताना पोलिसांकडून ट्रॅक्टर संचलनाला परवानगी मिळाल्याचे सांगितले. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर संचलन पूर्णपणे शांतेत असेल,असेबी त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान प्रजासत्ताक दिनी पाकिस्तान उपद्रव करु शकतो अशी शक्यता वर्तवल्यानंतर शेतकरी संघटना सहमत असल्याचे दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी सांगितले. दिल्लीमध्ये ट्रॅक्टर संचलनाचा १०० किलोमीटर पेक्षा अधिक मार्ग असेल.

 

या शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या निमित्ताने पाकिस्तानचा भारतात उपद्रव घडविण्याचा प्रयत्न आहे, असाही दावा त्यांनी केला.

English Summary: Tractor rally to be held after Republic Day Published on: 25 January 2021, 03:33 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters