काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे दर बाजारपेठेत घसरल्याने शेतकऱ्याचा खर्च देखील निघणे मुश्किल झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो अक्षरशः रस्त्यावर फेकले होते. परंतु आता त्या टोमॅटोला सोन्याचे दिवस आले आहेत
देशांमधील विविध बाजारपेठेमध्ये टोमॅटोने शंभरी पार केली असून ग्राहकांना शंभर रुपये प्रति किलोने टमाटे विकत घ्यावे लागत आहेत. पूर्ण देशात सर्वाधिक महाग टमाटे हे अंदमान आणि निकोबार ची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे मिळत आहे.तेथे एक किलो टोमॅटो घेण्यासाठी चक्कर 113 रुपये द्यावे लागत आहेत. दिल्लीमध्ये काहीसा टोमॅटोच्या दरात दिलासा असून तेथे 65 ते 90 रुपये प्रति किलो इतका दर आहे.
टोमॅटो महाग होण्याची कारणे
यावर्षी सगळीकडे पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे शेतांमध्ये असलेल्या पिकांचे व भाजीपाल्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या दक्षिणेकडील राज्य टोमॅटोचा पुरवठा करत आहेत.
तसेच लग्नसराईचे दिवस सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात टोमॅटोची मागणी वाढली आहे. ही प्रमुख कारणे टोमॅटो महाग होण्यामागचे आहेत. टोमॅटो व्यापाऱ्यांच्या मते पुढील टोमॅटोचे पीक निघायला अजून दोन महिन्याचा कालावधी बाकी आहे. नवीन लावलेले टोमॅटोचे पीक बाजारात येऊ लागेल तेव्हा म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान भाव कमी होऊ शकतात. कारण 15 ऑक्टोबर दरम्यान टोमॅटोची लागवड करण्यात येते.
तसेच आता कोरोना काळातील निर्बंध खुले झाल्याने सगळी हॉटेल्स व रेस्टॉरंट उघडी गेल्यामुळे टोमॅटोची मागणी वाढली आहे.
नॅशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या नुसार जगातीलप्रमुख टोमॅटो उत्पादक देशांमध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतामध्ये जवळजवळ 7.89 लाख हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड करण्यात येते. सध्या टोमॅटोची उत्पादकता पाहीली तर साधारणतः 25 टन प्रति हेक्टर याप्रमाणे 1.975 कोटी टन देशभरात टमाटे उत्पादन केले जाते.
(संदर्भ-दिव्य मराठी)
Share your comments