1. बातम्या

Tomato Rate : टोमॅटोमुळे शेतकरी झाला करोडपती; आजून पण कोटीचे टोमॅटो शिल्लक, पण...

शेतात एक कोटी रुपयांचे टोमॅटोचं पीक शिल्लक आहे. संततधार पावसामुळे पिकाचं नुकसान होणार असल्याने त्यांना पिकाची काळजी वाटत आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Tomato Rate

Tomato Rate

मुंबई

टोमॅटोचे भाव वाढल्याने गृहणींच आर्थिक बजेट कोलमडले आहे. मात्र टोमॅटो उत्पादक शेतकरी मिळणाऱ्या भावामुळे करोडपती झाले आहे. काही उत्पादक शेतकऱ्यांचे टोमॅटोमुळे नशीब बदले आहे. देशात टोमॅटोचे यंदा उत्पादन कमी झाल्यामुळे टोमॅटोला चांगला दर मिळाला आहे. काही भागात १०० ते १५० किलोचा भाव टोमॅटोला मिळत आहे.

तेलगंणातील मेडक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने टोमॅटोचे पीक घेतले आहे. नेमके दर वाढलेले असतानाचा टोमॅटो काढणीला आल्याने हा शेतकरी चांगलाचा मालामाल झाला आहे. मेडक जिल्ह्यातील कौडीपल्ली मंडलातील मोहम्मद नगर गावातील बी महिपाल रेड्डी असं या शेतकऱ्याचं नाव आहे. महिपाल रेड्डी आधी त्यांच्या २० एकर शेतजमिनीवर भातशेती करायचे. पण, त्यानंतर त्यांनी टोमॅटोची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे जणू त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती देताना महिपाल रेड्डी म्हणाले की, शेतात एक कोटी रुपयांचे टोमॅटोचं पीक शिल्लक आहे. संततधार पावसामुळे पिकाचं नुकसान होणार असल्याने त्यांना पिकाची काळजी वाटत आहे. रेड्डी यांनी स्वतःची २० एकर जमीन सोडून त्यांनी ८० एकर भाडेतत्त्वावर घेतली असून ६० एकरमध्ये भातशेती केली आहे आणि उर्वरित जमिनीवर ते इतर पिके घेतात.

English Summary: Tomatoes make farmers millionaires There are still crores worth of tomatoes left but Published on: 27 July 2023, 03:31 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters