MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

टोमॅटो उत्पादकांना २५ कोटी रुपयांचा फटक, पंधरा दिवसापासून बंद आहेत बाजार समित्या

नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, भागात टोमॅटोचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते. पण येथील बाजार समित्या बंद असल्याने किलोमागे चार ते पाच रुपयांनी दर खाली आले आहेत. यामुळे पंधरा दिवसात सुमारे २५ कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
टोमॅटो उत्पादकांना फटका

टोमॅटो उत्पादकांना फटका

नगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) अकोले, संगमनेर, भागात टोमॅटोचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. पण येथील बाजार समित्या (Market Committees) बंद असल्याने किलोमागे चार ते पाच रुपयांनी दर खाली आले आहेत. यामुळे पंधरा दिवसात सुमारे २५ कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच कुकुंबर मोझॅक व्हायरस (Cucumber Mosaic virus) (सीएमव्ही) जीबीएनव्ही, व टोमॅटो (Tomatoes), क्लोरोसिस या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रादुर्भाव कमी असला तरी नुकसान होत आहे. नगर जिल्ह्यातील अकोल, संगमनेर, कोरपगाव, श्रीरामपूरसह राहता तालुक्यात साधरण ७ हजार हेक्टर क्षेत्रात टोमॅटोच पीक घेतले जाते. एप्रिल अखेरपर्यंत साधरण तीस-४० टक्के तोडा संपलेला असतो. मंगळवारी बाजार समित्या सुरू झाल्या असल्या तरी, गेल्या पंधरा दिवसांपासून असलेल्या लिलाव बंदचा मोठा फटका बसला असून पाच रुपयांनी दर खाली आले आहेत.

 

फक्त पाच रुपयांनी दर खाली आले तरी टोमॅटो उत्पादकांना सुमारे २५ कोटींपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाले आहे. विषाणूजन्य रोगान साधारण ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाले असून ते नुकसान २५ कोटींपेक्षा अधिक आहे. दरम्यान, संगमनेर, अकोले, भागात दरवर्षी साधरण जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात टोमॅटोची लागवड केली जाते. गेल्या वर्षीपासून टोमॅटोवर राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन संस्थेने केलेल्या तपासणीत कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही), जीबीएनव्ही व टोमॅटो क्लोरोसिस या रोगाचा प्रादुर्भाव असल्याची बाब स्पष्ट केले होते.

 

गव्हावरील माव्याचा टोमॅटोवर परिणाम होत असल्याची बाब निदर्शनात आल्यानंतर यंदा कृषी विभागाने कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना माहिती देत दरवर्षी तुलनेत यंदा एक महिना उशिरा लागवड केली. त्याचा परिणाम म्हणून रोगाचा प्रादुर्भाव कमी करता आला असून यंदा हे नुकसान २० टक्क्यांवर आल्याचं कृषी विभागातून सांगण्यात आले.संगमनेर, अकोले,श्रीरामपूर भागातून नाशिकमधील सह्याद्री अॅग्रो व इतर ठिकाणी दर दिवसाला थेट विक्रीतन सात ते १० टन टोमॅटोची शेतकरी गट, शेतकरी कंपन्यामार्फत विक्री सुरू होती. त्यामुळे नुकसान टळले. संगमनेरमधील कुरण गावात थेट बांधावर व्यापाऱयांनी खरेदी सुरू ठेवली, असे उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बाराळ व आत्माचे समन्वय वैभव कानवडे यांनी सांगितले.

English Summary: Tomato growers hit by Rs 25 crore, market committees are closed for 15 days Published on: 28 May 2021, 11:02 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters