1. बातम्या

Agriculture News: आजच्या शेतीच्या महत्वाच्या ५ बातम्या

अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राण प्रतिष्ठापणेच्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममुर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झालीय.. संपूर्ण अयोध्या अयोध्या शहर पूर्णपणे सजले आहे.तब्बल 500 वर्षांहून असलेली प्रतीक्षा आज संपलीय.पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकप्रिय क्रिकेटपटू, उद्योगपती, संत, सेलिब्रिटी आणि विविध देशांच्या प्रतिनिधींसहित हा सोहळा पार पडतोय.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
आजच्या शेतीच्या महत्वाच्या ५ बातम्या

आजच्या शेतीच्या महत्वाच्या ५ बातम्या

१.रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेने अखेर ५०० वर्षांची प्रतिक्षा संपली, देशभरात पार पडतोय सोहळा
२.राज्यातील तापमानात चढ-उतार
३.पीक विम्या संबंधित सर्व समस्या सुटणार,लवकरच सुरु होणार टोल फ्री क्रमांक
४.कांदा आवकेत वाढ , दरात मात्र घसरण
५.तुरीचे उत्पादन घटल्याने तुरीच्या दरात वाढ

 

१.रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेने अखेर ५०० वर्षांची प्रतिक्षा संपली, देशभरात पार पडतोय सोहळा

अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राण प्रतिष्ठापणेच्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममुर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झालीय.. संपूर्ण अयोध्या अयोध्या शहर पूर्णपणे सजले आहे.तब्बल ५०० वर्षांहून असलेली प्रतीक्षा आज संपलीय.पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकप्रिय क्रिकेटपटू, उद्योगपती, संत, सेलिब्रिटी आणि विविध देशांच्या प्रतिनिधींसहित हा सोहळा पार पडतोय.. भारत, अमेरिका, ब्रिटनसह विविध देशांमध्ये प्राणप्रतिष्ठानिमित्त उत्सव होतोय.दरम्यान,आज प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर आज सायंकाळच्या वेळी दिपोत्सव साजरा केला जाणार आहे. तसंच राम मंदिर परिसरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यासोबतच देशभरातील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्रात देखील आज विविध ठिकानी वेगवेगळ्या पद्धतीने हा सोहळा पार पडतोय..दिव्यांची रोषणाईने, फटाक्यांच्या उत्साहात संपुर्ण देशभरात आनंदमय वातावरण असल्याच पाहायला मिळतय..

२.राज्यातील तापमानात चढ-उतार

उत्तर भारताचा थंडीचा जोर कायम असल्याने गारठा आहे. या वातावरणाबरोबरच राज्यातील वातावरणावर देखील याचा परिणाम झालेल्या दिसून येत आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा १० अंशाखाली असल्याचे पाहायला मिळाला आहे. यामुळे राज्यात आता गारठा वाढताना दिसत आहे. राज्यातील तापमानात चढ-उतार सुरुच आहे. किमान तापमानात देखील चांगलीच घट दिसून आली आहे. यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढला आहे.उत्तर भारतातील राज्यांमध्ये सध्या कडाक्याच्या थंडी आहे. थंडीबरोबरच धुक्यामुळे लोकांच्या अडचणीत वाढ होत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर भारतातील राज्यांना थंडीचे दिवस आणि धुक्यापासून दिलासा मिळताना दिसत नाही. पुढील पाच दिवस उत्तर भारतातील राज्यांमध्ये दाट ते दाट धुके दिसून येईल. त्याचबरोबर पुढील तीन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे.देशाची राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर येथे विक्रमी थंडी आहे. अलीकडेच येथे शिमल्याच्या तुलनेत कमी तापमानाची नोंद झाली. तर रविवारी थंडी आणि धुक्याने आणखी एक विक्रम मोडला. रविवारी सकाळी दिल्लीचे किमान तापमान श्रीनगरच्या बरोबरीने नोंदवले गेले. राष्ट्रीय राजधानीत रविवारी तापमान ४.८ अंश सेल्सिअस होते. जे हंगामाच्या सरासरीपेक्षा तीन अंशांनी कमी होते. येत्या काही दिवसांत दिल्लीत थंडी आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.


३.पीक विम्या संबंधित सर्व समस्या सुटणार,लवकरच सुरु होणार टोल फ्री क्रमांक

सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे.त्यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे. शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा ३७ कोटी लाभ मिळाला आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती पाहता पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विमा मिळतो.पुर्वी शेतक्यांना याच्या माहीतीासठी प्रतिक्षा करावी लागत होते. आता या पीक विम्याच्या माहितीसाठी शेतकऱ्यांना प्रतिक्षा करावी लागणार नाही. कारण आता लवकरच एक टोल फ्रि क्रमांक येणार आहे.यावर सगळी सविस्तर माहिती मिळणार आहे.कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार,आतापर्यंत सुमारे ३७ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे.तसे नैसर्गिक आपत्ती पाहता पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत शेतकर्‍यांचा विमा काढला जातो.तरीदेखील पिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकर्‍यांनी क्लेम केल्यावर त्यावर लक्ष लवकर दिले जात नाही . पण आता देशातील शेतकऱ्यांना अशा समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.कारण लवकरच शेतकऱ्यांच्या पीक विम्याशी संबंधित सर्व समस्या एका फोन कॉलवर सोडवल्या जातील.शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी या टोल फ्री क्रमांक १४४४७ वर कॉल करावा लागणार आहे.

४.कांदा आवकेत वाढ , दरात मात्र घसरण

कांदा उत्पादक शोतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे.कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.नोव्हेंबर २०२३ मध्ये खरीप कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या सप्ताहापर्यंत आवक मर्यादित होती. तेव्हा प्रतिक्विंटल ३,५०० रुपयांपर्यंत सरासरी दर होते. मात्र निर्यातबंदीमुळे क्विंटलमागे १८०० ते १९०० रुपयांपर्यंत घसरण झाल्याने आजवर १७०० कोटी रुपयांपर्यंत तोटा राज्यातील कांदा उत्पादकांचा आहे.मात्र एकीकडे निर्यातबंदी, तर दुसरीकडे देशांतर्गत पुरवठा मंदावल्याने जानेवारीच्या सुरुवातीला १८०० ते १९०० रुपयांवरून दर १३०० रुपयांवर आले आहेत.क्विंटलमागे शेतक्यांना ६०० रुपयांपर्यंत तोटा बसतोय.कांदा उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे .देशांतर्गत कांद्याचा पुरवठा व्हावा व दर नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने ७ डिसेंबर रोजी निर्यातबंदीचा निर्णय घेतला.हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फास ठरत आहे. राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक पट्टा असलेल्या नाशिक जिल्ह्यात लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणे, मुंगसे या बाजार आवारांमध्ये कांद्याला जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सरासरी १८०० ते २००० रुपयांपर्यंत सरासरी दर होता.आता कांद्याची आवक वाढत गेली असली तरी देखील मात्र देखील कांद्याच्या दरावर परिणाम दिसून येत आहे.

५.तुरीचे उत्पादन घटल्याने तुरीच्या दरात वाढ

देशातील तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं आहे,आणि त्यामुळे आता त्यातच बाजारात तुरीला चांगली मागणी मिळत असल्याचे पाहाायला मिळत आहे.अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आह्.कापूस आणि सोयाबीनला अपेक्षेनूसार भाव नसल्याने शेतकऱ्यांना तुरीकडून अपेक्षा उरल्या होत्या.विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीनं पुन्हा 'दहा' हजारांचा टप्पा गाठला आहे.काल २० जानेवारी- - ७,४०० - १०,२८५ रू हा भाव मिळाला.आता पुढील काही दिवस तुरीचा दर वाढु शकतो.दरा संदर्भात तेजी कायम राहणार असून लवकरच तुरीच्या दराचा टप्पा '११ हजार' रूपयांपर्यंत जाऊ शकतो,असा अंदाज बाजार समितीच्या कृषी अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

 

 

English Summary: Today's important farming news Agriculture News Published on: 22 January 2024, 05:16 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters