1. बातम्या

Tommato Bajarbhav: शेतकरी बंधुंनो!टोमॅटो उत्पादक शेतकरी आहात तर वाचा आजच्या काही निवडक बाजार समितीतील बाजार भाव

टोमॅटोची लागवड महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. भाजीपाला पिकातील हे एक प्रमुख पीक असून बऱ्याचदा टोमॅटो पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे नफा मिळतो. परंतु कधीकधी टोमॅटोचे दर इतके घसरतात की अक्षरशः टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च देखील निघणे कठीण जाते. सध्या टोमॅटोचे दर बऱ्यापैकी असून या लेखात आपण काही निवडक बाजार समितीतील टोमॅटोचे आजचे बाजार भाव पाहू.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
tommato market rate today

tommato market rate today

टोमॅटोची लागवड महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. भाजीपाला पिकातील हे एक प्रमुख पीक असून बऱ्याचदा टोमॅटो पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे नफा मिळतो. परंतु कधीकधी टोमॅटोचे दर इतके घसरतात की अक्षरशः टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च देखील निघणे कठीण जाते. सध्या टोमॅटोचे दर बऱ्यापैकी असून या लेखात आपण काही निवडक बाजार समितीतील टोमॅटोचे आजचे बाजार भाव पाहू.

नक्की वाचा:Crop Veriety: शेतकरी बंधुंनो! या रब्बीत ज्वारी लागवड करण्याचा प्लान आहे का? तर करा निवड 'या' दोन जातींची, मिळेल भरघोस उत्पादन

 टोमॅटोचे आजचे बाजार भाव

1- औरंगाबाद बाजार समिती- औरंगाबाद बाजार समितीमध्ये आज टोमॅटोची 51 क्विंटल आवक होऊन झालेल्या लिलावात कमीत कमी तीन हजार पाचशे रुपये दर मिळाला तर जास्तीत जास्त  चार हजार रुपये दर मिळाला. टोमॅटो दराची सरासरी 3750 रुपये राहिली.

2- श्रीरामपूर बाजार समिती- श्रीरामपूर बाजार समितीमध्ये आज 29 क्विंटल टोमॅटोची आवक होऊन झालेल्या लिलावात 2500 रुपये किमान भाव मिळाला तर जास्तीत जास्त भाव हा 3500 रुपये पर्यंत होता. सरासरी दर तीन हजार रुपये इतका राहिला.

3- सातारा बाजार समिती- सातारा बाजार समितीमध्ये 32 क्विंटल टोमॅटोची आवक होऊन कमीत कमी दर दोन हजार रुपये ते जास्तीत जास्त 3500 रुपये दर मिळाला. टोमॅटो दरांची सरासरी ही 2700 रुपये इतकी राहिली.

4- पुणे बाजार समिती- बाजार समितीमध्ये आज 1242 क्विंटल टोमॅटोची आवक होऊन झालेल्या लिलावात कमीत कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये दर मिळाला. दराची सरासरी ही दोन हजार 150 रु. राहिली.

नक्की वाचा:Shimla Mirchi Veriety: 'या' दोन जातींची लागवड देईल सिमला मिरची पासून बंपर उत्पादन, शेतकरी बंधूंना मिळेल बंपर नफा

5- नागपूर बाजार समिती- नागपूर बाजार समितीमध्ये आज एक हजार क्विंटल टोमॅटोची आवक होऊन झालेल्या लिलावात कमीत कमी तीन हजार रुपये तर जास्तीत जास्त चार हजार रुपये दर मिळाला. भावाची सरासरी  3750 रुपये राहिली.

6- मुंबई बाजार समिती- मुंबई बाजार समितीमध्ये आज 2548 क्विंटल टोमॅटोची आवक होऊन कमीत कमी चार हजार रुपये तर जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये दर मिळाला. भावाची सरासरी चार हजार चारशे रुपये राहिली.

7- कळमेश्वर बाजार समिती- कळमेश्वर बाजार समितीत आज 19 क्विंटल टोमॅटोची आवक झाली व झालेल्या लिलावात 2055 रुपये कमीत कमी तर तीन हजार जास्तीत जास्त दर मिळाला. भावाची सरासरी 2525 इतकी राहिली.

नक्की वाचा:शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई पिक विमा मिळण्यासाठी स्वाभिमानीचा आंदोलनाचा ईशारा!

English Summary: today tommato market rate in some important market comitee in maharashtra Published on: 19 October 2022, 08:54 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters