राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे, तर काही भांगामध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. पुणे, मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. सध्या राज्यातील कोकण विभागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर मुंबईसह उपनगर ठाणे, पालघर या जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यासह मराठवाड्यातही काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान आजही कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह इतर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहेतर पुणे, मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे.
तर काही सखल भागामध्ये पाणी साचल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. ठाणे जिल्ह्यातही चांगला पाऊस कोसळत आहे. तर आज राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.
काळ्या टोमॅटोच्या शेतीतून मिळवा लाखोंचे उत्पन्न! जाणून घ्या लागवड, खर्च आणि उत्पन्न…
पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, वर्धा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर, मुंबईला आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात मात्र आज पावसाच्या सरी कोसळणार नसल्याचा अंदाज आहे. मुंबईसह ठाणे, नाशिक, धुळे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काळ्या टोमॅटोच्या शेतीतून मिळवा लाखोंचे उत्पन्न! जाणून घ्या लागवड, खर्च आणि उत्पन्न…
नांदेडमध्ये पावसाच्या हजेरीनंतर आता शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. उशिराने आलेल्या पावसाने आता शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केल्याचे चित्र शिवारात पाहायला मिळतंय. धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे. या पावसामुळे पेरण्यांना वेग मिळणार आहे. जिल्ह्यात तीन लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर ते पेरणे खोळंबल्या होत्या.
Share your comments