आज भाऊबीज भाऊ बहिणीच्या नात्याचं महत्त्व सांगणारा अत्यंत महत्त्वाचा सण आहे.भावाबहिणीने एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. यादिवशी बहीण भावाला ओवाळते आणि दोघंही एकमेकांना छान भेटवस्तू देतात. मात्र, यंदाच्या वर्षी भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त कोणता ते जाणून घेवूयात.
दिवाळी हा सण वर्षभरातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण. दिवाळी हा आनंदाचाआणि दिव्यांचा सण आहे.आपल्या देशात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हिंदू धर्मामध्ये दिवाळीचे खास महत्व आहे. दिवाळीत धनत्रयोदशी, वसुबारस, लक्ष्मीपूजनपासून ते भाऊबीजपर्यंत अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पण आनंददायी, उत्साही, चैतन्य वाढवणाऱ्या दिवाळीतील सगळ्यांचा आवडता सण म्हणजे भाऊबीज.
भाऊबीजचा सण कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा हा सण १५ नोव्हेंबरला बुधवारी साजरा केला जाईल. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची दुसरी तिथी ही मंगळवारी १४ नोव्हेंबरला दुपारी २ वाजून ३६ मिनिटांनी सुरू होईल, ती दुसऱ्या दिवशी १५ नोव्हेंबरला बुधवारी दुपारी १ वाजून ४७ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे, भाऊबीजचा शुभ मुहूर्त हा १५ नोव्हेंबरला दुपारी १ वाजून १० मिनिटे ते ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. या शुभ मुहूर्तावर भावाचे औक्षण करून भाऊबीज साजरी करू शकता.
Share your comments