बैलगाडा शर्यतीवर असलेली बंदी उठवावी यासाठी च्या राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.यासंदर्भातला सरकारी पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून त्यानंतर आज पेटा न्यायालयात बाजू मांडणार आहे. पेटा चा युक्तिवादानंतर निकाल अपेक्षित आहे. त्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.
राज्य सरकारने दाखल केलेल्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यात संदर्भातली याचिकेवर काल बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मागच्या वेळेची सुनावणी झाली होती त्याबाबत इतर राज्यांना नोटीस बजावण्यात आली होती.तसेच त्यांना याबाबतीत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. बैलगाडा शर्यतीवर मुंबई हायकोर्टानं सन 2017 मध्ये बंदी घातली होती. आता या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन सरकारी पक्षाचा युक्तिवाद झाला त्यानंतर आज पेटा आपली बाजू मांडणार आहे.
बैलगाडा शर्यत बंदीची पार्श्वभूमी
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी यासाठी विधानसभेत पासून ते लोकसभेपर्यंत मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात घोडा आणि बैल यांवरील अत्याचार थांबावेत, म्हणून एकाच गाडीला घोडा बैल जुंपण्यास बंदी होती. शर्यतीत बैलांना चाबकाने किंवा काठीने मारहाण करणे, बॅटरीचा शॉकदेणे तसेच टोकदार खिळेलावणे अशा अनेक प्रकार प्रकारे अत्याचार केले जातात.
या मुद्द्यांवर प्राणी मित्रांनी बैलगाडा शर्यत वर बंदी घालण्याची मागणी केली होती, तसेच अजूनही हे प्राणी मित्र आपल्या मागणीवर ठाम आहेत त्यामुळे या सर्वोच्च न्यायालय राज्य सरकारची याचिका निकाली काढणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बैलगाडा शर्यत म्हटलं म्हणजे ग्रामीण भागात या शर्यतींचे प्रचंड आकर्षण आहे. गावाच्या जत्रांमध्ये तमाशा आणि कुस्तीचे परदेशी रंगतात त्यासोबतच बैलगाडा शर्यत देखील रंगतात. परंतु हायकोर्टाने बंदी घातल्यानंतर या शर्यती बंद करण्यात आल्या आहेत.
Share your comments