सध्या कांद्याचे बाजारभाव मध्ये हळूहळू सुधारणा होताना दिसून येत आहे. अजून देखील नवीन कांद्याची म्हणजेच लाल कांद्याचे आवक पुरेशी होत नसून तसेच शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला जुना कांदा बऱ्याच प्रमाणात खराब झाल्यामुळे कांद्याचे आवक मागणीच्या मानाने अत्यल्प प्रमाणात होत आहे.
यामुळेच कांद्याच्या दरात हळूहळू का होईना सुधारणा होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही निवडकबाजार समितीतील लाल कांद्याचे दर किती होते? त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
महाराष्ट्रातील निवडक बाजार समितीतील लाल कांद्याचे दर
1- सोलापूर बाजार समिती- सोलापूर बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याची 17 हजार 322 क्विंटल आवक झाली. झालेल्या लिलावात कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 4000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला. भावाचे सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल इतकी राहिली.
2- जळगाव बाजार समिती- जळगाव बाजार समितीमध्ये आज 624 क्विंटल लाल कांद्याची आवक होऊन झालेल्या लिलावात कमीत कमी 452 रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त एक हजार 877 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. भावाचे सरासरी 1250 रुपये प्रति क्विंटल इतकी राहिली.
3- भुसावळ बाजार समिती- भुसावळ बाजार समितीमध्ये आज 49 क्विंटल लाल कांद्याची आवक होऊन 1500 रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त 1500 व भावाचे सरासरी देखील 1500 इतकीच राहिली.
4- संगमनेर बाजार समिती- संगमनेर बाजार समितीमध्ये आज 34 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. झालेल्या लिलावात कमीत कमी दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 3500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. भावाचे सरासरी 2750 रुपये प्रति क्विंटल इतकी राहिली.
5- पाथर्डी बाजार समिती- पाथर्डी बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याची 500 क्विंटल इतकी आवक झाली. झालेल्या लिलावात कमीत कमी पाचशे रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त 3500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. भावाची सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल इतके राहीली.
Share your comments