१. आजपासून मराठवाड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
आजपासून मराठवाड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याआधीच राज्य सरकारने मराठवाड्यातील जनतेला एक भेट दिली आहे. सरकारने मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांची नावे बदलली आहेत. याबाबत राज्य सरकारचे उपसचिव संतोष गावडे यांच्या सहीने राज्य सरकारने अधिसूचना देखील जारी केलीय. त्यामुळे औरंगाबाद शहरानंतर जिल्ह्याचंही नावंही बदलण्यात आलंय. त्यामुळे शहरानंतर जिल्ह्याचं नाव देखील बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलंय. तर उस्मानाबाद जिल्ह्याचंही नाव धाराशिव करण्यात आलंय.
२. राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी, सरकारचा निर्णय
राज्य सरकारने ऊसाबाबत एका मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या गाळप हंगामात उसाची टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३० एप्रिल २०२४ पर्यंत राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी अधिसूचना जारी केली आहे. तसंच आगामी ऊस गाळप हंगामात राज्यात उसाचे आणि साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याचं साखर आयुक्तालयाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने होण्यासाठी परराज्यात जाणाऱ्या उसावर बंदी घालणे आवश्यक आहे,’ असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले होते. त्यानंतर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलाय. तसंच या निर्णयामुळे शेतकरी नेत्यांकडून सरकारवर टीका केली जातेय.
३. मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
हवामान खात्याने आज राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांमध्ये हळूहळू पावसाचा जोर देखील वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलीय. पुढील चार पाच दिवसांत हा पाऊस जोरदार वाढण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टीच्या अलर्ट देखील देण्यात आलाय. तर 17 आणि 18 तारखेला गुजरात राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
४. विदर्भात जोरदार पावसाची हजेरी
विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. तर धरण क्षेत्रातही पावसाने चांगलाच जोर धरल्याने विदर्भातील दोन धरणे ओव्हर फ्लो झालीत.तसंच येत्या काही दिवसात विदर्भात आणखी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही हवामान विभागाने जारी केल्यात.
५. पुण्यात गणेशोत्सवासाठी ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त
दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पुण्यातील पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणे शहरात सात हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आलेत. गणेशोत्सावाच्या काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये आणि कायदा सुव्यवस्था बाधित रहावी. यासाठी बंदोबस्त तैनात आहे.
Share your comments