यावर्षी १० नोव्हेंबरला शुक्रवारी म्हणजे आज धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. याला धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार, कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला आयुर्वेदिक औषधाचे जनक धन्वंतरी देव समुद्रमंथनातून अमृत कलशासह प्रकट झाले होते. यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीची जयंती म्हणून साजरा केला जातो.
शुभ मुहूर्त - धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान गणेश, कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. आज या पूजेचा मुहूर्त सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी सुरू होणार असून ७ वाजून ४७ मिनिटांनी हा शुभ मुहूर्त संपणार आहे.धनत्रयोदशीच्या दिवशी लोक सोने किंवा चांदी खरेदी करतात. भगवान धन्वंतरी हा विष्णूचा अवतार असल्याचे मानले जाते.
दिवे दान करण्याचे महत्त्व -
धनत्रयोदशीच्या दिवशी दिवे दान केले जाते. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घराच्या दाराजवळ आणि अंगणात दिवे लावले जातात. या दिवशी संध्याकाळी भगवान यमासाठी दिवा दान केला जातो, असे केल्याने अकाली मृत्यूची शक्यता टळते असे मानले जाते. या दिवशी दान केल्याने संपत्तीमध्ये कित्येक पटींनी वाढ होते, अशी देखील मान्यता आहे.
Share your comments