भारत कृषीप्रधान देश आहे, या देशाची अर्थव्यवस्था सर्वस्वी शेती क्षेत्रावर अवलंबून आहे आणि या कृषिप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बळीराजाला आत्महत्येसाठी विवश व्हावे लागते हे खरंच लांच्छनास्पद आहे. संपूर्ण जगाचा पालन पोषण करणारा पालनहार, अन्नदाता बळीराजा स्वतःचेच पालन-पोषण करण्यात असमर्थ असल्याने आत्महत्या साठी प्रवृत्त होत असल्याचे सांगितले जात आहे. निसर्गाचा लहरीपणा तसेच शासनाचे शेतकरी विरोधी धोरण या दुहेरी संकटामुळे बळिराजा पुरता भरडला जात आहे. त्यामुळे बळीराजा आपल्या प्राणाचा त्याग करण्याचा टोकाचा निर्णय घेत असतो.
गेल्या अकरा महिन्यात राज्यात जवळपास 2500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा आकडा कृषिप्रधान देशाला धडकी भरवणारा आहे त्यामुळे या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन देशातील नामी शेतीतज्ञ तसेच ओबीसी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर चेअरमन प्राध्यापक काशीराम वंजारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक विशेष असा पॅटर्न राबविण्याचा तयारीत आहेत. प्राध्यापक काशीराम वंजारी राज्यात अकोले पॅटर्न राबविण्याच्या तयारीत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, वंजारी उद्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, व कृषिप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बळीराजाला वाचवण्यासाठी एक मोलाचा फॉर्म्युला मुंबई येथे सादर करणार आहेत. वंजारी उद्या तीन वाजता मुंबई मराठी पत्रकार संघमध्ये एका प्रेझेन्टेशन द्वारे या पॅटर्णचे सादरीकरण करणार आहेत, तसेच प्रसारमाध्यमांची देखील संवाद साधणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून सुलतानी व अस्मानी संकटामुळे हतबल झालेला अन्नदाता बळीराजा मरणाला कवटाळत आहे, राज्यात वाढत असलेला शेतकरी आत्महत्येचा आकडा कुठल्याही कृषिप्रधान देशासाठी मोठ्या शर्माचा असून यामुळे सर्वांच्या मनात मोठी धडकी भरली आहे. त्यामुळे उद्या वंजारी यांच्या या अकोले पॅटर्नकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या कृषिप्रधान देशात जगाचे पालन पोषण करणारा अन्नदाता बळीराजा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो मात्र याकडे कुणाचेच लक्ष लागत नाही, परंतुकोणी सिनेसृष्टी मधला स्टार आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतो तेव्हा ती मीडियासाठी नव्हे-नव्हे तर संपूर्ण राष्ट्रासाठी मोठी दुःखाची गोष्ट असते, तेव्हा संपूर्ण देशावर शोककळा पसरते, अशा बातमीचे मीडिया मोठे कवरेज करत असते. करायला ही हवं मात्र, ज्याप्रकारे एखाद्या सिनेसृष्टीच्या स्टारच्या आत्महत्येला तुम्ही राष्ट्रीय बातमी बनवून टाकतात त्याप्रमाणे बळीराजाच्या आत्महत्येचा हा वाढणारा आलेख देखील तुमच्यासाठी एक धक्कादायक आणि शॉक बसणारी बातमी असायला हवी असा संतप्त सवाल शेतकरी बांधव उपस्थित करीत आहे.
दिवसेंदिवस सुलतानी आणि आस्मानी संकट बळीराजाच्या अडचणीत भर पाडत आहे यामुळे बळीराजा पुरता कर्जबाजारी होत आहे. त्यामुळे उद्या वंजारी यांचा अकोले पॅटर्न शेतकऱ्यांच्या जीवनात एक नवीन सुवर्णंमय पहाट घेऊन येतो की नाही हे विशेष बघण्यासारखे असेल. शेतकरी बांधव देखील वंजारी यांच्या पॅटर्न कडे मोठ्या उत्सुकतेने बघत आहेत.
Share your comments