1. बातम्या

प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान तात्काळ वितरीत करून दोंडाईचा येथील सौर प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महानिर्मितीने  ४७६.७६ हेक्टर खासगी  जमिन थेट खरेदी पध्दतीने अधिग्रहित केली असून प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे. जेवढी जमिन या प्रकल्पासाठी आवश्यक आहे तेवढीच जमिन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी घ्यावी. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेवून स्थानिक प्रशासनाने गतीने सानुग्रह अनुदान वितरीत करावे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Devendra Fadanvis News

Devendra Fadanvis News

मुंबई : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे २५० मेगावॅटच्या सौर प्रकल्पासाठी आवश्यक तेवढीच जमीन खरेदी  करावी. लवकरात लवकर जमिन अधिग्रहण करुन सानुग्रह अनुदान देवून धुळे येथील दोंडाईचा प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधानभवन येथे धुळे येथील दोंडाईचा प्रकल्पाच्या आढाव्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावेपणन मंत्री जयकुमार रावलऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकरअपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्लामुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेप्रधान सचिव पी. अन्बलगनमहावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रामहापारेषणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमारमहानिर्मितीचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉ.बी.राधाकृष्णन.टाटा पॉवर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेश नंदा उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमहानिर्मितीने  ४७६.७६ हेक्टर खासगी  जमिन थेट खरेदी पध्दतीने अधिग्रहित केली असून प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे. जेवढी जमिन या प्रकल्पासाठी आवश्यक आहे तेवढीच जमिन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी घ्यावी. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेवून स्थानिक प्रशासनाने गतीने सानुग्रह अनुदान वितरीत करावे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १००० एकर जमिनीची आवश्यकता आहे. जर १३५० हेक्टर जमिन प्राप्त झाली तर ९०० एकरवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारावा उरलेली जमिन एमआयडीसीला देण्यात यावी. सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सौर ऊर्जेसाठी पॅनल तसेच इतर यंत्रणा उभारावी. टाटा पॉवर कंपनीने ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली की लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करावा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे सौर ऊर्जा प्रकल्प लवकर पूर्ण करावा तसेच या परिसरात उद्योग उभारण्यासाठी, एमआयडीसाला जागा देण्यात यावी अशी मागणी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली.

English Summary: To speed up the completion of the solar project at Dondaicha by disbursing welfare grants to the project victims immediately Chief Minister's order to the administration Published on: 25 March 2025, 03:46 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters