मुंबई - राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत राज्यातील २७ हजार ५२४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढवला आहे. दरम्यान या लॉकडाऊनच्या काळात कृषी क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. वाहतूक उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल शेतात सडून जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर कोरोनाचे संकट असताना टोमॉटो उत्पादक शेतकऱ्यांवर आणखी एक संकट आले आहे.
टोमॉटोमध्ये नवीन एका रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने राज्यातील टोमॉटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. या रोगामुळे हजारो एकरवरील टोमॉटोची शेती खराब झाली आहे. या रोगाचे नाव तिरंगा व्हायरस असून या रोगामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा व्हायरसची लागण झाल्यानंतर टोमॉटोचा रंग आणि आकारमध्ये बदल होत आहेत. या व्हायरस किंवा या रोगाला शेतकरी तिरंगा म्हणत आहेत. पिकांवर हा रोग आल्यानंतर टोमॉटोला डाग पडत आहे, त्यानंतर टोमॉटो आतून काळ पडत सडू लागला आहे. टोमॉटोवर पिवळ्या रंगाचे पट्टे देखील पडत आहेत. यामुळे टोमॉटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
साधरण एक वर्षापर्यंत टोमॉटोचे उत्पादन बंद करावे लागेल अशी चर्चा होत असल्याने शेतकऱ्यांमधील चिंता अधिक वाढली आहे. याविषयी बातमी झी न्युजने दिली आहे. दरम्यान टोमॉटोची शेती करणाऱ्या एका शेतकऱ्यांला याविषयी विचारले असता शेती नष्ट होऊन आर्थिक फटका बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. टोमॉटो पिवळे पडत आहेत. बाजारात ग्राहक नाहीत. कोरोना व्हायरस आणि आता पिकांवरील या रोगांमुळे आमची चिंता वाढल्याचे रमेश वाकले यांनी सांगितले. टोमॉटोवर तीन रंग येत आहेत. यामुळे उत्पादन खराब होत आहे. कोणता रोग टोमॉटोवर आला आहे. याची माहिती आम्हाला नाही, पण आम्ही याला तिरंगा व्हायरस म्हणत असल्याचं एका शेतकऱ्यांने सांगितले.
महाराष्ट्रात फेब्रुवारी आणि एप्रिलच्या दरम्यान टोमॉटोचे उत्पादन घेण्याचे प्रमाण वाढले आहे. टोमॉटो शेती ही नगदी शेती असून या शेतीसाठी खूप मेहनत घ्यावी लागते. एका एकरमध्ये साधरण एक ते दोन लाख रुपयांचा खर्च येत असतो. फेब्रुवारीत जे टोमॉटो लावण्यात आले त्यांच्या उत्पन्नातील टोमॉटोमध्ये पिवळा रंग येऊ लागला आहे. त्यानंतर त्यांचा रंग सफेद होऊ लागला, डाग दिसू लागले त्यानंतर टोमॉटो आतून सडू लागले. या व्हायरसमुळे संगमनेर आणि अकोला येथील शेतकरी चिंतेत पडले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोला आणि संगमनेर भागातील ५ एकर हजार एकर क्षेत्रातील टोमॉटोवर तिरंगा व्हायरसचा प्रादुर्भाव पडला आहे.
Share your comments