राज्यात कोरोनाव्हायरस हळूहळू आपले पाय पसरवीताना दिसत आहे. कोरोनाचा नवा वैरिएंट ओमायक्रोनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील जनता चिंताग्रस्त झाल्याचे चित्र नजरेस पडत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने शासन दरबारी अनेक उपाययोजना देखील राबवल्या जात आहेत, मात्र कोरोनासाठी राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनेत शासनाचा दुटप्पी व्यवहार बीड जिल्ह्यात बघायला मिळाला. जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात किनगाव येथे आठवडी बाजार भरत असतो. या आठवडी बाजारासाठी एका शेतकऱ्याने मेथीची भाजी विक्रीसाठी नेली होती मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने पोलिसांनी या संबंधित शेतकऱ्याला मेथीची भाजी विक्री करण्यास मज्जाव केला. शेवटी या संतप्त शेतकऱ्यांने विक्रीसाठी आणलेली मेथीची भाजी नाईलाजाणे फेकून दिली.
शेतकरी मित्रांनो किनगाव येथे बुधवारी आठवडी बाजार भरत असतो, या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांनी किनगाव येथे भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. मात्र शासनाचे निर्बंध असल्याने पोलिसांनी शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी मज्जाव केला, या प्रकरणातून संतप्त झालेल्या एका शेतकऱ्यांने विक्रीसाठी आणलेली मेथीची भाजी स्वतःहून रानोमाळ फेकून दिली. सध्या राज्यात कोरोना नामक व्हायरस आपले पाय झपाट्याने पसरवीत आहे, त्यामुळे शासनाने कडक निर्बंध लादण्यात सुरुवात केली आहे. मात्र असे असले तरी शासनाचे निर्बंध हे केवळ कष्टकरी शेतकरी व कामगार वर्गांपुरतेच मर्यादित आहेत की काय? असा सवाल शेतकरी बांधव व्यक्त करत आहेत.
हा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण असे की, शासनाणे कोरोना प्रतिबंधित उपाययोजनेचे पालन करून राज्यात अनेक सेवा पूर्ववत सुरु केले आहेत. एवढेच नाही तर राज्यात शाळा कॉलेजेस नियमांचे पालन करून अद्ययावत करण्यात आल्या आहेत. तसेच लग्नसमारंभासाठी देखील शासनाने काही नियम व शर्तीचे पालन करून मंजुरी दिली आहे. मग भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोना नियमांचे पालन करून भाजीपाला विक्री करू देण्यास कुठली हरकत आहे असा संतप्त सवाल आता शेतकरी बांधव मायबाप सरकारला विचारता झाला आहे? मायबाप सरकार आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की गेल्या दोन वर्षापासून शेतकरी राजा मोठ्या कष्टाने पिकवलेला आपला शेतमाल कवडीमोल दराने विकण्यासाठी मजबूर झाला आहे, कारण जरी नैसर्गिक असले तरीदेखील यासाठी मायबाप सरकार देखील तेवढेच जबाबदार आहे.
राज्यात इतर सर्व गोष्टी सुरळीतपणे सुरू असू शकतात, मात्र कोरोना नियमांचे पालन करूनही जगाचे पालन पोषण करणारा शेतकरी राजा आपल्या पोटासाठी दोन पैसे देखील कमवू शकत नाही? ही खऱ्या अर्थाने कृषिप्रधान देशातील एक मोठी शोकांतिका आहे. किनगावात घडलेली घटना जरी पोलिसांनी नियमांचे पालन करण्यासाठी केली असली, तरी आठवडी बाजार बंद करणे अथवा शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री न करू देणे हा राज्यात वाढत असलेल्या कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कुठल्याही पद्धतीने खात्रीशीर उपाय नाहीये, त्याऐवजी कोरोना नियमांचे पालन करून शेतकरी राजांना आपल्या पोटापाण्यासाठी दोन पैसे कमावण्याचे स्वातंत्र्य मायबाप सरकारने द्यावे असे शेतकरी बांधव आपले कठोर मत यावेळी व्यक्त करत आहेत.
Share your comments