गेल्या काही दिवसांपासून राज्यात शेतकऱ्याची विजतोडणी केली जात असून यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. अनेक शेतकऱ्यांची यामुळे हाताला आलेली पिके जळू लागली आहेत. यामुळे सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिवस वीज मिळावी म्हणून कोल्हापूरमध्ये आंदोलन केले होते. यामुळे 10 तास कृषीपंपासाठी वीज पुरवठा देण्याचा निर्णय झाला आहे. असे असताना आता अहमदनगर जिल्ह्यात कृषी पंपाची वीज तोडणी मोहीमच बंद करण्यासाठी रास्तारोको करण्यात आला होता.
रयत संघटनेच्या वतीने हा रास्तारोको करण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. सध्या शेतकऱ्यांची अनेक पिके हाताला आली असून त्यांना आता पाण्याची गरज आहे. मात्र वीज तोडल्यामुळे पाणी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे हा रास्तारोको करण्यात आला होता. श्रीगोंदा तालुक्यातील नगर-दौंड रोडवर मढेवडगाव येथे दोन तास रास्तारोको केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी संघटना आक्रमक होत आहेत. अनेक शेतकऱ्याचे यामध्ये नुकसान होत आहे.
या आंदोलनात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांसह श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामुळे येणाऱ्या काळात हा प्रश्न अजूनच पेटणार असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांचा ऊस शेतात आहे, कालावधी उलटूनही त्याचे गाळप झालेले नाही. त्यामुळे शेककऱ्यांनी वीज बिल कुठून भरणार? असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करत आहेत. यामुळे राजकीय वातावरण देखील तापले आहे.
सध्या १५ महिने होऊन गेले असले तरी अनेक शेतकऱ्यांचे ऊस अजूनही तुटून गेले नाहीत. यामुळे वजनात घट होणार आहे. दोन टप्प्यात एफआरपीचा शासन निर्णय मागे घेऊन उस उत्पादकांना एक रकमी एफआरपी मिळावी. राज्य शासनाच्या कर्ज माफीपासुन वंचित राहिलेले शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत थकीत कर्जमाफी मिळावी. या मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. आता यावर सरकार निर्णय घेणार की पुन्हा संघर्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Share your comments