गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. असे असताना अजून देखील पावसाची शक्यता सांगितली गेली आहे. राज्यात मार्च महिन्यानंतर एप्रिल महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस अन् गारपीट होत आहे.
आता पुणे आयएमडीने पुन्हा राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे अजून काही दिवस वातावरण असेच राहील तसेच तापमानात वाढ होणार आहे.
पुणे शहर आणि उपनगरामध्ये तीन दिवस पावसांचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट ऑरेंज दिला आहे. यामुळे काही दिवस महत्वाचे आहेत.
राज्यात विकास सोसायट्यांचे जाळे वाढणार, २ लाख संस्था स्थापन करणार, केंद्राचा निर्णय..
दरम्यान, पुणे शहरासह उपनगरांमध्ये तीन दिवस पावसाचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. शहरात दिवसभर ऊन तर संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण असणार आहे. यामुळे अनेकांना आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
भारतीय शेतीतील सिंचन व्यवस्थापन
पुणे शहराला हवामान खात्याचा येलो अलर्ट दिली आहे. आज आणि उद्या पुणे शहरात जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. पाऊस येणार असला तरी उन्हाळ्यातील वाढत्या तापमानापासून दिलासा मिळणार नाही. तापमान सध्या 40 वर गेले आहे.
धक्कादायक! बैलगाडा शर्यतीसाठी गेलेल्या युवकाच्या पोटात बैलाने खुपसले शिंग, तरुणाचा जागीच मृत्यू..
भारतीय शेतीमध्ये सौर उर्जेवर चालणाऱ्या ट्रॅक्टरचे फायदे
पीक विम्यापासून अजूनही शेतकरी वंचीत, शेतकरी संघटना आक्रमक..
Share your comments