
electricity
कृषी पंपविज बिल थकबाकी मधून मुक्तता मिळावी यासाठी महावितरणकडून 66 टक्के सवलत दिली जात आहे.आता यायोजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तीन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे.
जर यामधील महाराष्ट्राचा विचार केला तर आतापर्यंत या योजनेचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील जवळजवळ सहा लाख 45 हजार 812 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून त्यापैकी एक लाख 94 हजार 381 शेतकऱ्यांनी थकबाकी मध्ये 66 टक्के सवलत देतसंपूर्ण विजबील थकबाकी मुक्त केले आहे.
या योजनेचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी महावितरणने गावोगावी जनजागृतीपर शेतकऱ्यांचे मेळावे घेतले तसेच शेतकऱ्यांसोबत संवाद मोहिमेचे देखील आयोजन करण्यात येत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे वीज बिलाबाबत तक्रार नसेल अशा तक्रारींचे निराकरण करण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
राज्याचे ऊर्जामंत्री ना.डॉ. नितीन राऊत यांनी जाहीर केलेल्या कृषी पंप विज जोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या नवीन कृषी पंपाच्या वीज जोडण्या तसेच मधून थकबाकी मुक्ती तसेच स्थानिक विज यंत्रणेचे विस्तारीकरण, सक्षमीकरणाला वेग मिळाला आहे. या योजनेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये कृषी पंपाच्या पस्तीस हजार सहाशे एकोणवीस नवीन वीज जोडणी कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे चालू व थकीत वीज बिल भरणा यातून ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रासाठी प्रत्येकी 33 टक्के असा एकूण 755 कोटी 88 लाख रुपयांचा आकस्मिक निधी जमा झाला आहे.
या निधीचा उपयोग विजंत्रा राजस्थानी कामांसाठी आत्तापर्यंत 202 कोटी 67 लाख रुपये खर्चाचे 5757 कामाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. या योजनेला पश्चिम महाराष्ट्रातील पुणे,सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून आतापर्यंत सहा लाख 45 हजार 812 शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यातील चालू विज बिल सह सुधारित थकबाकीचे 929 कोटी 54 लाख रुपयांचा भरणा केला आहे.
Share your comments