1. बातम्या

वाणेवाडीत साडेतीन एकर ऊस जळाला, शेतकऱ्याचे मोठे नुकसान

सध्या उसाचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची ऊसतोड सुरू आहे. असे असताना वीजवाहक तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत वाणेवाडी (ता. बारामती) येथील साडेतीन एकर ऊस जळाला आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
sugarcane burnt wanewadi

sugarcane burnt wanewadi

सध्या उसाचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची ऊसतोड सुरू आहे. असे असताना वीजवाहक तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत वाणेवाडी (ता. बारामती) येथील साडेतीन एकर ऊस जळाला आहे.

यामुळे यामध्ये शेतकर्‍यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी बाळकृष्ण भोसले, अक्षय भोसले, विलास भोसले, बेबी बापूराव जगताप, सुरेखा रामदास संकपाळ या सर्व सभासदांचा मिळून 3.5 एकर ऊस आगीत जळाला आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न देखील करण्यात आले.

सोमेश्वरचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच त्यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, वीजवाहक तारांना झोळ पडले आहेत तर काही ठिकाणी तारा थेट हातालाच येत आहेत.

Raju Shetti: 'मुकादमांच्या फसवणुकीमुळं ऊस वाहतूकदार अडचणीत'

यामुळे धोका निर्माण झाला आहे, यामुळे मोठे नुकसान टाळण्यासाठी महावितरणने प्रयत्न करणे गरजेचे आहे. उसाच्या पिकातून शेतकर्‍यांना ठोस उत्पन्न मिळते. अवकाळी पावसामुळे ऊस सोडून सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Soyabean Rate Today: आज सोयाबीनच्या भावात वाढ, जाणून घ्या आजचे दर

शेतकरी उसाला जिवापाड जपत असतो. महावितरणकडून जळीत उसाला फारशी नुकसान भरपाई मिळत नाही. यासाठीही वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही.

महत्वाच्या बातम्या;
शेणाचं केलं सोनं! शेणाच्या उत्पादनांमधून करोडोंची कमाई...
औरंगाबादेत बैलगाडा शर्यतीवरून राडा, पोलिसांचा लाठीचार्ज
युट्यूबवर व्हिडिओ पाहून शेतकऱ्याने केली खेकडा पालनाला सुरुवात, आता कमवतोय ६ लाख

English Summary: Three half acres sugarcane burnt Wanewadi, loss farmer Published on: 06 November 2022, 03:48 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters