MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 3 शैक्षणिक संस्था

नवी दिल्ली: राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज देशातील शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग जाहीर करण्यात आली. देशातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 3 शैक्षणिक संस्थांचा 5 श्रेणींमध्ये समावेश आहे.

KJ Staff
KJ Staff
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


नवी दिल्ली: राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज देशातील शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग जाहीर करण्यात आली. देशातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 3 शैक्षणिक संस्थांचा 5 श्रेणींमध्ये समावेश आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात आज उच्च शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग-2019 जाहीर झाली. शिक्षण, शैक्षणिक साधने, संशोधन तसेच व्यावसायिक पद्धती या मापदंडांवर एकूण 8 श्रेणींमध्ये पहिल्या 10 सर्वोत्कृष्ट संस्थांची यादी जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील 3 संस्थाचा 5 श्रेणींमध्ये  समावेश आहे.

आयआयटी मुंबई ने तीन श्रेणींमध्ये उमटवला ठसा 

शैक्षणिक क्षेत्रात समग्र रँकिंगमध्ये देशातील एकूण 10 सर्वोत्कृष्ट संस्थांची निवड झाली असून भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी बॉम्बे) ने यात 4 था क्रमांक पटकावला आहे. यासह सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी संस्थाच्या श्रेणीमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी बॉम्बे) ने तिसरे स्थान तर सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांच्या श्रेणीमध्ये याच संस्थेने 10 वा क्रमांक पटकाविला आहे. औषधीय संस्थांच्या श्रेणीमध्ये मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेने (आयसीटी मुंबई) चौथा क्रमांक पटकाविला आहे तर सर्वोत्कृष्ट 10 विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे 10 व्या क्रमांकावर आहे.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट 8 शैक्षणिक संस्थांना विविध श्रेणींमध्ये यावेळी सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग-2019 मध्ये देशभरातील 4 हजार शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. 

English Summary: Three educational institutes in Maharashtra in the National Institutional Ranking Published on: 09 April 2019, 07:46 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters