1. बातम्या

आनंदाची बातमी:पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार कर्जाचे व्याज

जे शेतकरी घेतलेल्या पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना दिलासा देईल असा एक शासन निर्णय 16 फेब्रुवारी रोजी घेण्यात आला आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
benifit of intrest to farmer

benifit of intrest to farmer

जे शेतकरी घेतलेल्या पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना दिलासा देईल असा एक शासन निर्णय 16 फेब्रुवारी रोजी घेण्यात आला आहे.

राज्यातील नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या अंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी दिले जाते. या योजनेसाठी 2021 पासून केंद्र सरकारच्या माध्यमातून तीन टक्के आणि राज्य सरकारच्या माध्यमातून चार टक्के असे तीन लाख रुपये पर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी दिले जाणार आहे. 2020 आणि 21 मध्ये पीक कर्ज घेतलेल्या परंतु 30 जून पर्यंत आपले कर्ज नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांचे अनेक प्रस्ताव आले आहेत. त्यामध्ये निधीअभावी जवळजवळ 43900.000 ला एवढे प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळे सन 2021 व 22 ची  मंजुरी अर्थसंकल्पियतरतूद वगळता 33500.000 लाखांची पुरवणी मागणी जुलै 2021 च्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आली होती.

त्यापैकी 9600.00 लाख इतकी  मंजूर करण्यात आली असून सदर रकमेच्या 60 टक्के इतका निधी वित्त व  नियोजन विभागाच्या मान्यतेने वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने रु.5760.00 लाख निधी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.

 याबाबतचा शासन निर्णय

 सन 2021-22 या वर्षात डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत  (2425-1009)-33 अर्थसहाय्य या लेखशीर्षकखाली जुलै 2021 च्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणी द्वारे रुपये 9600.00 लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

सदर रकमेपैकी नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने 60 टक्के म्हणजे रु.5760.00 लाख एवढ्या निधीचे वितरण करण्यास या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे. हा निधी वितरित झाल्यानंतर एक लाख रुपयांपर्यंतचे पिक  कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कर्जावरजेव्याज आहे ते त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

English Summary: those farmer paid reguler crop loan that farmer get intrest benifit direct in bank account Published on: 18 February 2022, 04:56 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters