भारत हा दरवर्षी मोठ्या प्रमाणात साखर उत्पादन करतो आणि उत्पादीत साखर ही मोठ्या प्रमाणात निर्यात देखील करतो. साखर निर्यात करणाऱ्या देशात ब्राझील शीर्षस्थानी विराजमान आहे आणि भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देशाचा तमगा मिरवतो ही नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (एआयएसटीए किंवा एआयएसटीए) अनुसार भारतातून साखरेची निर्यात ही सातत्याने वाढत आहे. भारतीय साखर कारखान्यांनी यावर्षी विक्रमी 72.3 लाख टन निर्यात केली आहे. ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन ही साखर व्यवसायाशी संबंधित युनिट्सची संघटना आहे.
ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन ह्या संस्थेने म्हटले की, साखर कारखान्यांनी 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या विपणन वर्ष 2020-21 मध्ये अंदाजे 72.3 दशलक्ष टन साखर निर्यातीचा अंदाज लावला आहे. यातील बहुतांश निर्यात इंडोनेशियाला करण्यात आली. ह्या संस्थेने पुढे म्हटले की, विपणन वर्ष 2020-21 (ऑक्टोबर ते सप्टेंबर) मध्ये एकूण निर्यातीपैकी 70.6 लाख टन साखर निर्यात करण्यात आली आहे, तर सुमारे 1,66,335 टन साखर पाठवली जात आहे.
साखरेचा गोडवा ह्या वर्षी अधिकच वाढला…
ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या मते, मार्केटिंग वर्ष 2020-21 मध्ये, सरकारी अनुदानासह सुमारे 60 लाख टन साखर निर्यात केली गेली आणि 7.85 लाख टन साखर विनाअनुदान निर्यात केली गेली. ह्या वर्षी इंडोनेशियाला सर्वात जास्त म्हणजे जवळपास 18.2 दशलक्ष टन साखर निर्यात झाली, इंडोनेशिया नंतर सर्वात जास्त साखर ही अफगाणिस्तानला निर्यात केली गेली अफगाणिस्तानला जवळपास 6,69,525 टन साखर निर्यात केली, तर यूएईला 5,24,064 टन साखर निर्यात झाली आणि सोमालियाला 4,11,944 टन साखर निर्यात केली गेली आहे.
हे आकडे साखरेचा मार्केटिंगचा गोडवा अधिक वाढलाय असंच सांगत आहेत आणि ही बातमी नक्कीच साखर उत्पादक क्षेत्रासाठी महत्वाची ठरेलं.
पुढील वर्षासाठी देखील साखर निर्यातीसाठी झालेत व्यवहार
ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या मते, नवीन मार्केटिंग इयर 2021-22 मध्ये आतापर्यंत सुमारे 1.5 दशलक्ष टन साखर निर्यातीचे सौदे हे ऑलरेडी झाले आहेत. अनेक साखर कारखान्यांनी येत्या हंगामात निर्यातीसाठी वायद्याचे करार केले आहेत.
त्यामुळे भारतीय साखर कारखाने या संधीचा लाभ घेतील आणि पुढील हंगामातही सहा दशलक्ष टणापेक्षा अधिक साखरेची निर्यात करतील असा विश्वास आणि आशा आहे.
Source TV9 Bharatvarsh
Share your comments