महाराष्ट्रातील नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. प्रत्येक वर्षी नाशिक मधील शेतकऱ्यांना पावसामुळे होणाऱ्या नुकसनीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळं शेतकरी वर्गाच्या मदतीसाठी सरकार नेहमी मदत करण्याचा हेतूने शेतकरी वर्गासाठी नेहमी नवीन नवीन योजना आणत असते.
फळपीक विमाकवच मध्ये फक्त फळ बागांचा समावेश आहे:
प्रत्येक वर्षी नाशिक मध्ये होणाऱ्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीने येथील शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. हाता तोंडाला आलेला घास पावसामुळे खराब होतो म्हणून येथील शेतकरी प्रत्येक वर्षी तोट्यात जात आहे.आणि उत्पादन सुद्धा खूपच कमी प्रमाणात येत आहे.यामुळे शासनाने यंदाच्या वर्षी फळपिकांना विमाकवच देण्याचे जाहीर केले आहे. या फळपीक विमाकवच मध्ये फक्त फळ बागांचा समावेश आहे या मध्ये अर्ली द्राक्षे आणि डाळिंब या फळबागांचा समावेश आहे.
हेही वाचा:फळपीक विमा बाबत राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय
त्यामुळे शासनाच्या या फळपीक विमाकवच या योजनेमुळे नाशिक मधील शेतकरी वर्गाला भरघोस फायदा होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात बागलाण, मालेगाव, देवळा, कळवण या ठिकाणी सहा हजार हेक्टर पेक्षा ही जास्त क्षेत्रावर अर्ली द्राक्ष या फळ पिकाची लागवड केली जाते. अर्ली द्राक्षे याचे निघणारे भरघोस उत्पादनाची निर्यात आणि विक्री परदेशात मोठ्या प्रमाणावर प्रत्येक वर्षी होत असते.परदेशीय देशात द्राक्ष ची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यामुळे परकीय चलन मोठ्या प्रमाणात सरकार ला मिळत होते.
परंतु गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे फळबाग शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान होत होते. त्यामुळं नाशिक येथील आमदारांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे पीक विमा कवच मागणी केली होती.या मागणी नंतर सर्व बागांचे सर्वेक्षण करून शासनाने सकारात्मक अहवाल शेतकऱ्याच्या बाजूने दिला आहे. या निर्णयामुळे अर्ली डाक्षे आणि डाळिंब या पिकाला 3 वर्ष्यापर्यंत चा विमा कवच देण्याचा निर्णय शासनाने केला आहे. त्यामुळं नाशिक परिसरात असलेले शेतकरी आनंदात आहेत.
Share your comments