गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. कोकणातीूल अनेक भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. धरणांतील पाणी पातळी स्थिर होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर जून, जुलै महिन्यात कोकण मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात सक्रिय असलेला पाऊस ऑगस्ट महिन्यात मुंबईसह राज्यात सर्वदूर बरसल्याने महाराष्ट्र सुखावला आहे.
एक जूनपासून राज्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे पावासाचा चांगला जोर असल्याने धरणेही भरु लागली आहेत. दरवर्षी दुष्काळ सोसणाऱ्या मराठवाड्यात यंदा सर्वाधिक पाऊस झाला. मात्र राज्यातील इतर पाच जिल्ह्यांमध्ये तुरळक हजेर लावली. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी विहार व तुळशी तलाव भरुन वाहू लागले आहेत. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून कमी प्रमाणाक पाऊस होत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस बरसल्याने धरणांतील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १२ धरणांतून सध्या विसर्ग सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगा वगळता अन्य नद्याचे वाढणारे पाणी स्थिर झाले आहे. पाऊस कमी असल्याने पाटबंधारे विभाग येत्या दोन दिवसांत धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण आणखी कमी करण्याची शक्यता आहे. कोयना धरणातून विसर्ग ३० हजार क्युसेकपर्यंत कमी झाल्याने कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी स्थिर झाली. चांदोली धरणांतून सुरू असणारा १५ हजार क्युसेक विसर्ग नऊ हजार क्युसेकवर आणण्यात आला. राधानगरी धरणाच्या दोन स्वयंचलित दरवाजातून विसर्ग सुरूच असल्याने भोगावती व पंचगगा नद्याच्या पाणी पातळीत सुरूच होती.
राधाराम बंधाऱ्याजवळ पंचगगेची पाणी पातळी ४१ फूट चार इतकी होती. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. महाबळेश्वर, पाटण, जावली, सातारा या तालुक्यात काही ठिकाणी दमदार सरी कोसळल्या, इतर सर्व तालुक्यात हलका पाऊस झाला. पावसामुळे शेतीकामे ठप्प झाली आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा शिडकावा झाला. तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या.
Share your comments