शेतकरी हा जगाचा पोशिंदा असला किंवा त्याला सगळे बळीराजा म्हणत असले तरी दिवसेंदिवस शेती करणे फारच कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे दरवर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झालेल्या पहायला मिळतात. विदर्भात आत्महत्यांचे प्रमाण अधिक असले तरी यंदा कोकणातील शेतकरी फारच कठीण परिस्थितीतून जात आहे. आंबा सुरुवातीला महाग असला तरी बाजारपेठेत आंबा कमी आल्याचे चित्र आहे.
शिवाय मुंबई बाजारपेठेत दरवर्षी होणारी आर्थिक उलाढाल निम्म्यांवर आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यंदा कोकणातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. निसर्गाच्या अवकृपेने यंदा आंबा टप्याटप्याने अवकाळी पावसाचा बळी ठरला. त्यामुळे झाडाला लागलेला मोहर गळून गेला. त्यात परिस्थितीवर मात करून टिकून राहिलेला आंबा सुद्धा शेवटच्या टप्प्यात झालेल्या अवकाळी पावसाने गळून पडला. त्यामुळे वारंवार आंबा पीक सावरताना शेतकरी हैराण होऊन गेला.
शेवटी हतबलतेने शेतकरी असल्याची खंत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मे महिनाभरात कोकणातील आंबा हंगाम संपुष्टात येईल. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात हापूसचे दर चढे होते. मात्र त्याचा फायदा केवळ दरवर्षीच्या तुलनेत २५ टक्केच आणि तो ही काही ठराविक शेतकऱ्यांनाच झाला. मुंबई बाजारपेठेत यंदा केवळ ४० लाख पेट्यांचीच आवक झाल्याचे सांगण्यात येते आहे. तर आर्थिक उलाढाल तुलनेने कमी झाल्याचे व्यापारी प्रतिनिधी सांगत आहेत.
बाजारात सध्या देवगड, रत्नागिरी आणि रायगड येथील हापूस आवक सुरू आहे. तर इतर आंब्याचा हंगामही सुरू झाला आहे. नीलम, तोतापुरी, लगडा, दोहरी हे आंबेदेखील दाखल होत आहेत. हापूसचा मे अखेरीपर्यंत हंगाम सुरू राहील. जूनमध्ये सुरुवातीला जुन्नर हापूस दाखल होण्यास सुरुवात होईल. तो हंगाम २० जूनपर्यंतच चालेले असेही सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या;
21 हजाराला विकला जातोय फक्त एक आंबा, या आंब्याची राज्यात चर्चा...
पुण्यात रंगणार देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत, दीड कोटींचे बक्षीस..
शेळीपालन अॅप: 'हे' मोबाइल अॅप शेळीपालनाबद्दल देतात चांगली माहिती, मिळेल दुप्पट नफा
Share your comments