यावर्षी गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असताना अतिरिक्त ऊस मोठ्या प्रमाणात शेतातउभा आहे. हा ऊस तुटावा यासाठी शासन आणि कारखान्यांचे नियोजन सुरू आहे.
ज्या कारखान्यांचे गाळप हंगाम संपला आहे अशा कारखान्यांचे हार्वेस्टर देखील गाळप बाकी असलेल्या कारखान्यांना भाडेतत्वावर दिले जातआहे.एवढेच नाही तर परराज्यातून देखील हार्वेस्टरमागवले जात आहे. या अतिरिक्त ऊस तोडणीसाठी अथक प्रयत्न आणि नियोजन केले जात आहे. परंतु दरवर्षी मार्च महिन्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम हा जवळजवळ संपतो. परंतु मराठवाड्यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न जास्त प्रमाणात असल्याने ऊस तोड हंगाम लांबेल यात शंका नाही. एवढेच नाहीकार्यक्षेत्रातील उसाचे संपूर्ण तोड झाल्याशिवायकारखाने बंद करू नयेत असे आदेश साखर आयुक्तालय यांनी दिले आहेत.परंतुमजूर नसले तर ऊस कसा तूटणार ही एक मोठी समस्या आहे.
नक्की वाचा:मोठी बातमी : अतिरिक्त ऊसावर तोडगा; ऊसतोडणीसाठी आता परराज्यातून येणार तोडणी यंत्र
कारण ऊसतोड मजुरांनी आता आवराआवर सुरू केली असूनत्यांना घरी परतण्याचे वेध लागलेले आहेत.अशातच ऊस तोड मजूर थांबावेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे जेणेकरून ते थांबतील.
त्यामुळेबीड जिल्ह्यातील सुंदर रावजी साखर कारखान्याने एक योजना आखली आहे. ती म्हणजे ऊस तोड मजूरथांबाव्यात यासाठी प्रति मेट्रिक टन शंभर रुपयेदेण्याचा निर्णय या कारखान्याने घेतलेला आहे.जास्त पैसे मिळतील या आशेनेतरी ऊसतोड मजूर थांबतील हा यामागचा हेतू असून या कारखान्याचे मजूर बीड जिल्ह्यातीलच आहेत त्यामुळे मजुरांना हा निर्णय परवडेल अशी अपेक्षा आहे.
ऊसतोड मजुरांना परतीचे वेध
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊनजवळजवळ पाच महिने झाले.परंतु अजूनही गाळप खूप जोरात चालू आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कारखान्याचा गाळप हंगाम संपत येतो. परंतु या वर्षी पाण्याची चांगली उपलब्धता आणि हातात नगदी पैसा देणारे पीक म्हणून या वर्षी ऊस लागवड क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाढ झाली.
नक्की वाचा:स्कायमेट नंतर भारतीय हवामान विभागाचा अंदाज : जून ते सप्टेंबर दरम्यान पडणार 99% पाऊस
त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होऊन अजूनही गाळप सुरू आहे.
आपल्याला माहित आहेच की ऊसतोड मजूर हे घरदार सोडूनऊस तोडण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रात येतात. त्यांना घर सोडून पाच महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला मुळे त्यांना आता परतीचे वेध लागले आहेत. त्यामुळे आता ऊसतोड मजूर टिकून राहावे व अतिरिक्त ऊस सुटावा यासाठी साखर कारखाना आणि प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे सुंदर रावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यांनी काढलेली ही शक्कल कितपत कामी येते हे येणारा काळच ठरवेल.
Share your comments