1. बातम्या

ऊसतोड मजूर राजाची कमाल! एकट्याने तोडला एका दिवसात 16 टन ऊस

शेती आणि कष्ट हे एकमेकांशी संलग्नित क्षेत्र आहे.कष्टाशिवाय शेती हा विचारच करता येत नाही. अशीच एक नवल वाटेल आणि अभिमान देखील वाटेल अशी घटना वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथे घडली.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
cane cutting work

cane cutting work

 शेती आणि कष्ट हे एकमेकांशी संलग्नित क्षेत्र आहे.कष्टाशिवाय शेती हा विचारच करता येत नाही. अशीच एक नवल वाटेल आणि अभिमान देखील वाटेल अशी घटना वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथे घडली.

कुंडलवाडी येथे ऊसतोड मजूर असलेले ईश्वर रामचंद्र सांगोलकर( वय 50 ) यांनी एकट्याने एका दिवसात वीस गुंठ्यातील एक नव्हे दोन नव्हे तब्बल 16 टन ऊस तोडून विक्रम केला आहे. या कामाबद्दल ईश्वर सांगोलकर यांचा सत्कार वारणा साखर कारखाना प्रशासनाने केला.

 वारणा साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामासाठी कुंडलवाडी येथील संजय फाटक यांनी ऊस पुरवठा करण्यासाठी ट्रॅक्टर चा  करार  केला आहे.याट्रॅक्टर वर खैराव येथील ऊसतोड मजुरांची टोळी कामाला आहे. याच टोळीमध्ये ईश्वर सांगोलकर हे ही आहेत.

सांगोलकर यांनी एकट्याने एका दिवसात वीस गुंठ्यातील 16 टन ऊस तोडण्याचा  विक्रम केला आहे. त्यांनी केलेल्या या विक्रमाची वारणा कारखाना प्रशासनाने दखल घेतली असून कारखान्याचे शेती अधिकारी प्रमोद पाटील, उसा अधिकारी विजय कोळी इत्यादी मान्यवरांनी सांगोलकर यांचा थेट उसाच्या फडात जाऊन सत्कार केला.

यामध्ये विशेष असे कि, ऊस तोडण्याचे हे काम करत असताना त्यांनी दिवसभरात फक्त दोन बिस्कीट पुडे आणि ताक पिऊन 20 गुंठ्यातील 16 टन ऊस तोडला.त्यांनी हा  विक्रम 27 डिसेंबर 2021 रोजी अशोक सावंत या शेतकऱ्यांच्या शेतात केला.(संदर्भ-लोकमत)

English Summary: this suger cane labour cut 16 tonn cane in one day by self this record Published on: 15 January 2022, 11:17 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters