शेतकरी आधुनिक व्हावेत, त्यांना बाजारभाव आणि हवामानाचा अंदाज कळावा यासाठी प्रत्येक सरकार आग्रही आहे. गुजरात सरकारने या बाबतीत एक पाऊल पुढे टाकत शेतकऱ्यांना स्मार्टफोन देणार असल्याची घोषणा केली आहे. पक्षी बचाव मंडपाचा आढावा घेण्यासाठी राजकोटला गेलेले गुजरातचे कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री राघवजी पटेल यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
यावेळी त्यांनी सांगितले की, यापूर्वी 15 हजार रुपये राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोबाईल खरेदीसाठी दिले जात होते. यात आता वाढ करण्यात आली असून आता सरकार 40 टक्क्यांची आर्थिक सहाय्यता 15 हजारच्या स्मार्टफोनवर करणार आहे.
म्हणजेच काय शेतकऱ्यांना यातून 6 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांना मोबाईल घेण्यासाठी अडचणी किंवा त्रास होऊ नये, यासाठी कमीत-कमी कागदपत्रे घ्यावीत, असे निर्देश मंत्रालयाने दिले आहेत. जर शेतकरी 10 हजार रुपयांचा मोबाईल घेणार असेल तर त्याला 1 हजार रुपयांची मदत मिळेल. तर 20 हजार रुपयांचा मोबाईल घेण्यासाठी सरकार 15 हजार रुपयांची मदत करणार आहे.
दरम्यान सरकार करत असलेल्या मदतीपेक्षा मोबाईल विक्रेते अधिक सूट देत आहेत. मदत घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्जाची प्रिंट, मंजुरी आदेश, 7/12 दाखला, स्मार्ट मोबाईल जीएसटीचा बिल असे कागदपत्रे द्यावी लागतात. त्यानंतर दोन महिन्यानंतर शेतकऱ्यांना मोबाईलचा पैसा मिळत असतो.
Share your comments