या वर्षी कापूस आणि सोयाबीन या खरीप हंगामात प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान झाले. या दोन्ही पिकांच्या उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात घट आली. खरीप हंगाम मधील शेवटचे पीक म्हटले तुरीला देखील याचा परिणाम जाणवला.
तुर उत्पादनात देखील मोठी घट आली आहे. त्यातच बाजारपेठेमध्ये सध्या तुरीची आवक होत आहे परंतु दुसरीकडे तुरीची विक्रमी आयात झाल्याने तुरीचे दर सध्या खुल्या बाजारात हमीभावापेक्षा देखील कमीच आहे.परंतु येणाऱ्या भविष्यामध्ये तुरीच्या उत्पादन घटल्याचे चित्र जसेजसे स्पष्ट व्हायला लागेल तसतसे तुरीच्या दरात देखील सुधारणा पाहायला मिळतील.त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तर सरकारी धोरणांचा अडथळा आला नाही तर तूरदरामध्ये सुधारणा होऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.
सध्या तुरीची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती…..
सध्याच्या बाजारपेठेचा विचार केला तर बाजारपेठेमध्ये तुरीची आवक हळू प्रमाणात होत आहे परंतु डाळ मिलर्स कडून तुरीला उठाव नसल्यानेमिलर्स कडून होणारी खरेदी देखील सामान्य आहे. तसेच जे देश तुरीचे निर्यात करतात अशा देशांकडे तुरीची उपलब्धता कमी असल्याने आयातीचे प्रमाण देखील कमी आहे.
सध्या जि तुर आयात केली जाते तिचे दर हे देशांतर्गत तुरी पेक्षा कमी आहेत. त्यामुळे आयात तुरीला मागणी जास्त आहे. तसेच तुर निर्यातदार जुन्या तुरीची विल्हेवाट लावत आहेत. केंद्र सरकारने तूर आयात मुक्त श्रेणीत ठेवल्याने देशामध्ये चालू वित्तीय वर्षात नऊ महिन्यात पाच लाख टनांपेक्षा जास्त तुरीची आयात झाली आहे. जर दोन हजार वीस आणि एकवीस या वर्षाचा विचार केला तर देशात साडेचार लाख टनांपेक्षा जास्त तुरीची आयात झाली होती. तूर आयात झालेल्या वाढीचा दबाव बाजारपेठेवर दिसत आहे. देशांतर्गत उत्पादनाचा विचार केला तर ते कमी होऊन 30 ते 30 लाख टनांच्या दरम्यान राहील असा अंदाज जाणकारांचा आहे. तुरीचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटले आहे परंतु आयातीमुळे दर दबावात राहत आहेत. देशांतर्गत उत्पादनात घट झाल्याने आयातदार देखील तुर विक्री करण्याची शक्यता कमीच आहे.
त्यामुळे येणार्या एक ते दीड महिन्यानंतर तुरीच्या दरात सुधारणा होऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या काही बाजारपेठांमध्ये तुरीचा कमाल दर हा हमीभावापेक्षा म्हणजे सहा हजार तीनशे रुपये च्या पुढे जात आहे. सर्वसाधारण देशात तुरीच्या दराचा विचार केला तर 5900 ते सहा हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान सध्या आहे.
Share your comments