जगात मोठ्या प्रमाणात प्राण्यांचे संगोपन केले जाते, अनेक प्राणीप्रेमी पशुची खरेदी करतात आणि त्याचे संगोपन करत असतात. अनेक शेळीपालन (goat rearing) करणारे शेतकरी बोकड खरेदी करत असतात. आज आपण एका बोकडविषयी जाणुन घेणार आहोत, तो सध्या एक चर्चेचा विषय ठरला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एक बोकड तब्बल 21 हजार डॉलर म्हणजे 15 लाख 65 हजाराला विकला गेला
ऐकून शॉक बसला ना पण हे खरं आहे, बुधवारी न्यूसाऊथ वेल्स (New South Vells) मध्ये एका बाजारात ह्या बोकड्याची विक्री झाली. ह्या 15 लाख रुपये किमतीच्या बोकड्याला एन्ड्रू मोसलीने (Andrew Mosali) खरेदी केले. ऑस्ट्रेलियामध्ये याआधी कधीही बोकड्यासाठी एवढी मोठी बोली कधीच लागली नव्हती. ह्या बोकडला खरेदी करणाऱ्या मोसलीच्या मते त्यांनी खरेदी केलेला हा बोकड दिसायला खुपच सुंदर आहे. त्याच्या किमतीमुळे हा बोकड एक विवीआयपी बोकड (VVIP Buck) ठरला आहे. ह्या विवीआयपी बोकड्याला माराकेश नावाने ओळखले जाते.
याआधी पण काही बोकड लाखात विकले गेलेत
याआधी ऑस्ट्रेलियामध्ये एक बोकड 12 हजार डॉलर म्हणजे जवळपास 9 लाख रुपयाला विकला गेला होता, हा बोकड आतापर्यंत ऑस्ट्रेलियातला सर्वात महागडा बोकड होता.
माराकेश बोकडणे ह्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर अर्जित केला आहे. माराकेशला खरेदी केल्यानंतर मोसली खुप आनंदी दिसत होते. त्यांच्या मते, माराकेश हा दिसायला खुप सुंदर आहे, मारकेशची चाल हि खुप आकर्षक आहे, ह्या बोकड्याचा आकार हा जरी लहान असला, परंतु याची वाढ हि खुप लवकर झाली आहे. माराकेशचे मसल्स हे खुप दंगट आणि शानदार आहेत.
मोसलेला महागड्या बोकड्यांची खरेदी करण्याची आवड आहे
मोसलेला महागड्या बोकडाची खरेदी करण्याची आवड आहे. त्यांनी याआधी देखील महागे बोकड खरेदी केले आहेत, गेल्या वर्षी मोसलेनी एक बोकड खरेदी केला होता त्याची किमत हि 9 हजार डॉलर म्हणजे 7 लाख रुपयाच्या आसपास होती. मोसलेच्या म्हणण्यानुसार या प्रकारचे बोकड हे कमी प्रमाणात पाहावंयास मिळतात त्यामुळे असे बोकड एकदा हातातून गेलेत तर परत मिळत नाहीत. ह्या बोकड्याच्या मासाची मागणी हि खुप वाढली आहे. मारकेशचा जन्म हा क्वींसलैंड बॉर्डरच्या जवळ रेंगेलैंड नावाच्या फार्ममध्ये झाला आहे.
Share your comments