राज्यसभेमध्ये उपस्थित केलेल्या एका प्रश्नाला लेखी स्वरुपात उत्तर देताना केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडवीय यांनी माहिती देताना म्हटले की,
2020-21 या वर्षामध्ये देशातील एकूण रासायनिक कीडनाशकांच्या मागणीत जवळजवळ पन्नास टक्के मागणी ही महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांमधून करण्यात आली. ही माहिती देताना मांडवीयम्हणाले की राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी रब्बी व खरीप हंगामातील एकूण रासायनिक कीडनाशकांच्या मागणीबाबत दिलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती देत असल्याचे ते म्हणाले. जर या वर्षात महाराष्ट्राच्या रासायनिक कीडनाशकांच्या मागणीचा विचार केला तर ती 14 हजार 396 टन इतकी आहे.
जर यातील राज्यांचा विचार केला तर यांच्या तुलनेमध्ये पंजाबने दोन हजार वीस एकवीस मध्ये केवळ पाच हजार 700 टन रासायनिक कीटनाशक मागवले होते. जर भारतातील ईशान्येकडील राज्यांचा विचार केला तर या राज्यांमध्ये रासायनिक कीडनाशकांचा वापर हा जवळ-जवळ होतच नाही. ईशान्येकडील मेघालय आणि सिक्कीम या राज्याची नोंद सेंद्रिय राज्य अशी करण्यात आली आहे.
त्यासोबतच देशातील एकूण कीडनाशकांच्या निर्मितीतही सातत्याने वाढ होत आहे. जर 2018 -19 या वर्षात 2.16लाख टन कीडनाशके निर्माण करण्यात आली होती. त्यातुलनेत 2020-21 साली तब्बल 2.55 लागतं कीडनाशकांची निर्मिती करण्यात आली. या आकडेवारीवरून दिसते की मागील काही वर्षापासून कीडनाशक निर्मितीमध्ये देखील वाढ झाली आहे.
Share your comments