मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे भाव हेस्थिर असून एकाच पातळीवर फिरत आहेत. सध्या सोयाबीनचे भाव सहा हजार ते सहा हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहेत. वायदे बाजारातून सोयाबीनला वगळल्यानंतर बाजारातील मागणी आणि पुरवठा यानुसार दर ठरत आहेत.
जर सोयाबीन बाजाराचा विचार केला तर दिवसाला दोनशे ते तीनशे रुपयांची चढ-उतार पाहायला मिळत आहे. या वाढलेल्या भावात सोयाबीनची मागणी सामान्य राहिल्याने सोयाबीनचे दर स्थिर आहेत.तसेच शेतकऱ्यांनीसाठवणुकीवर भर देऊनआवक पाहून सोयाबीनची विक्री सुरु ठेवल्याने आवकचा देखील दबाव सोयाबीन दरावर नाही.तसेच देशात सोयाबीनचे दर सोयाबीनचे दर अधिक असल्याने देशांतर्गत बाजारात आणि निर्यातीसाठी ही सोयापेंडला मागणी सरासरी आहे.
देशातील सोयापेंडची परिस्थिती
जर देशाचा विचार केला तर महिन्याला तीन ते साडेतीन लाख टन सोयापेंड लागते. सध्या बाजारामध्ये दिवसाला अडीच लाख पोत्यांची सरासरी आवक होत आहे. शेतकरी हे सोयाबीनची विक्री टप्प्याटप्प्याने करत असल्याने दर टिकून आहेत.जर मागील आठवड्यातील राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सोयाबीनच्या आवकचा विचार केला तर अनुक्रमे राजस्थानमध्ये 12000 पोते, मध्यप्रदेश मध्ये सव्वालाख पोते तर महाराष्ट्रात एक लाख दहा हजार पोत्यांची आवक झाली. मध्यप्रदेश मध्ये सोयाबीनचा दर 6 हजार शंभर ते सहा हजार तीनशे पन्नास च्या दरम्यान होता.राजस्थान मध्ये सहा हजार ते सहा हजार 400 रुपयांवर होता तर महाराष्ट्रात मागच्या आठवड्यात सोयाबीनचे दर हे सहा हजार ते सहा हजार तीनशे पन्नास होते. छत्तीसगड राज्यात सोयाबीनला सरासरी सहा हजार ते सहा हजार तीनशे रुपये दर मिळाला.
मागच्या आठवड्यामध्ये सोयापेंडला मागणी सामान्य राहिल्याने भावा मध्ये एक हजार रुपयांपर्यंत चढ-उतार होता. मध्यप्रदेश मध्ये एक आठवड्यात 52 हजार ते 54 हजार रुपये प्रति टन सोयापेंडचे व्यवहार झाले. राजस्थान मध्ये 53 हजार ते पंचावन्न हजार रुपये दर मिळाला तर महाराष्ट्रात प्रतिटन 53 हजार ते 56 हजार रुपये दर राहिला.
Share your comments