1. बातम्या

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आता 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान,पण आहेत 'हे' निकष

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान देण्याचे घोषित करण्यात आले होते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
condition for farmer to get encoragement ammount

condition for farmer to get encoragement ammount

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान देण्याचे घोषित करण्यात आले होते.

परंतु मध्यंतरी कोरोणा मुळे योजना रखडली होती. मध्यंतरी अर्थसंकल्पामध्ये याला मान्यता देण्यात आली होती व आता  प्रत्यक्षात काही दिवसांनी अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

परंतु यासाठी शासनाने काही निकष निश्चित केले असून, असे निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळणार आहे. या लेखात आपण हे प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी कुठले निकष आहेत, याची सविस्तर माहिती घेऊ.

 या कालावधीत घेतले असेल कर्ज तर मिळेल लाभ

 नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जे प्रोत्साहन 50 हजाराचे अनुदान देण्यात येणार आहे,

यासाठीचा विचाराधीन कालावधी हा 2017-18,2018-19 आणि 2019-20 असा आहे. या कालावधीतील नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजाराचा अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

नक्की वाचा:राज्यातील ऊस उत्पादकांना होणार फायदा, आता गुऱ्हाळ मालकाकडूनही एफआरपीनं मिळणार दर

हे आहेत महत्त्वाचे निकष

1-2017-18 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीककर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असावे.

2-2018-19 मध्ये घेतलेले अल्पमुदत पीककर्ज 30 जून 2019 पर्यंत पूर्णता परतफेड केलेले असावे.

3-2019-20 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड 31 ऑगस्ट 2020 पर्यंत परतफेड  पूर्णतः केलेली असावी.

या कालावधीत अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.

नक्की वाचा:मविआ अडचणीत परंतु बैठकीत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय

 परंतु 2019-20 या वर्षातील घेतलेल्या व त्याचे पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम जर पन्नास हजारपेक्षा कमी असेल तर अशा शेतकऱ्यांना घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतका प्रोत्साहन पर लाभ  देण्यात येणार आहे.

4- लाभ घेताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन 50 हजार रुपये या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ निश्चित करण्यात येणार आहे.

नक्की वाचा:सरकार पडले तरी चालेल पण दादा शब्द पूर्ण करणारच!! शेतकऱ्यांना दिले 50 हजार...

English Summary: this is important condition in regular debt payee farmer for get 50 thousand fund Published on: 24 June 2022, 02:28 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters