अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोडणीनंतर योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे प्रत्येक वर्षी तोडणीनंतर 25 ते 35 टक्के फळांचे नुकसान हे होतच असते. त्यासाठी फळांच्या तोडणीनंतर फळांचे योग्य व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे.
फळांच्या नासाडीची कारणे:-
बऱ्यापैकी फळांच्या तोडणी नंतर 25 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान हे योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे होते. तोडणी नंतर जर का फळे योग्य रीतीने हाताळली नाही तर फळांचे नुकसान होते. याचबरोबर योग्य पद्धतीने पॅकिंग न करणे, फळांची तोडणी व्यवस्तीत न करणे तसेच योग्य पद्धतीने साठवून न केल्यामुळे सुद्धा फळे खराब होतात. झाडाची तोडलेली ताज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. त्यामधी 10 टक्के पाणी हे बाष्पीभवनामुळे उडून जाते. त्यामुळे ठराविक काळाने फळे सुकायला लागतात. तसेच फळांच्या वजनात मोठ्या प्रमाणात घट होते. त्यामुळे बाजारात फळांना भाव सुद्धा कमी मिळतो. तसेच तोडणीनंतर रासायनिक बदल घडून आल्यावर सुद्धा फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
फळांच्या तोडणीनंतर अश्या प्रकारे करा व्यवस्थापन:-
फळे झाडावरून तोडल्यावर गुणवत्ता आणि आयुष्य या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या दोन्ही गोष्टी फळांच्या परिपक्वतेवर अवलंबून असतात. त्यामुळे फळांची तोडणी योग्य वेळेत करणे गरजेचे आहे. फळ पूर्णपणे पिके पर्यंत झाडाला ठेऊ नये तसेच आंबा तोडणीच्या वेळी झेल्याचा वापर करावा तसेच केळीचा घड कापण्यासाठी कोयत्या चा उपयोग करावा. आणि द्राक्ष काढणीसाठी कात्री तर चक्कू या धारधार अवजारांचा वापर करावा.
तसेच फळांच्या पॅकिंगसाठी लाकडी खोक्यांचा किंवा बॉक्स चा वापर करणे गरजेचे आहे सध्या फळे पॅकिंग साठी कोरुगेटेड पेट्यांचा वापर केला जातो. तसेच बॉक्स किंवा पेट्यांमध्ये फळे भरताना फळांच्या चारही बाजूला हवा खेळती राहिले पाहिजे या प्रकारे फळे भरावी. तसेच पेट्यांचा छिद्रे असणे गरजेचे आहे जेणेकरून हवा खेळती राहून फळे ताजीतवानी राहतील
Share your comments