चार पैशाचा आधार म्हणून शेतकऱ्यांनी आता भाजीपाल्याचा आधार घेतला आहे. याचेच उदाहरण म्हणून येवला तालुक्यातील पाटोदा गावातील शेतकरी साहेबराव बोराडे यांनी कमी जागेमध्ये मेथी च्या भाजीची लागवड केली आहे. साहेबराव यांनी २० गुंठ्यात योग्य प्रकारे व्यवस्थापन करून भाजीपाल्याची लागवड केलेली आहे. मध्यंतरी वातावरणाच्या बदलामुळे त्यांनी भाजीवर वेगवेगळी औषधे देखील मारली मात्र बाजारात घटते दर असल्याने साहेबराव हताश झाले. बाजारात मेथीला ५० पैसे प्रति जोडी असा दर सुद्धा मिळत नाही. याप्रमाणे दर असल्याने वाहतुकीचा सुद्धा दर निघत नसल्याने त्यांनी पूर्ण भाजीवर रोटर फिरवला आहे.
म्हणून फिरवला रोटर :-
लागवड केल्यापासून ते काढणी या तीन महिन्यांच्या दरम्यान मशागतीला लागणार खर्च तसेच औषध फवारणी, तोडणी आणि बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी लागणार वाहतुकीचा खर्च आणि बाजारात मेथीची ५० पैसे ला सुद्धा कोणी जोडी घ्यायला तयार नसल्याने साहेबराव यांनी आपल्या २० गुंठ्यात लावलेल्या मेथीच्या भाजीवर रोटर फिरवला आहे. साहेबराव यांची दिवसभराची मेहनत तसेच गेलेला खर्च सुद्धा निघत नसल्याने त्यांनी याप्रकारे संताप व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांचा हंगामी पिकावर भर :-
जी प्रमुख पिके आहेत त्या पिकांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकावर भर दिला परंतु निसर्गाने या पिकांना सुद्धा सोडले नाही. मागे झालेल्या वातावरणाच्या बदलामुळे तसेच अवकाळी पाऊसामुळे भाजीपाला पिकावर परिणाम झाला. पाऊसाने थोडी उघडीप देताच शेतकऱ्यांनी भाजीपालावर औषधे फवारणी करून भाजीपाला जोपासना केली. साहेबराव यांनी सांगितले की कमी क्षेत्रात योग्य ते नियोजन करून उत्पादन घेतले मात्र बाजारातील सूत्रे आपल्या हाती नाहीत जे की नैसर्गिकरित्या जी जी संकटे आली त्यावर मी माता करू शकलो पण बाजारपेठेत जी सूत्रे आहेत त्यावर मी काही करू शकत नाही.
बाजारपेठेवरच सर्वकाही अवलंबून :-
कोणत्या पिकाची लागवड करायची तसेच उत्पादन काय घ्यायचे याचे नियोजन शेतकरी करू शकतो तसेच वारंवार जी नैसर्गिक संकटे येतात त्या संकटांची मात करणे सुद्धा शेतकरी करू शकतो मात्र बाजारपेठेत जी दर चालू असतात त्यास शेतकरी काही करू शकत नाही त्यामुळे शेतकरी हताश होऊन जातो. तीन महिने जेवढा खर्च तर निघालाच नाही पण जे रोटर फिरवले तो खर्च आता अंगावर आहे असे साहेबराव सांगतात.
Share your comments