सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असलेल्या मोरोची गाव येथील लक्ष्मण सूळ यांनी व्यवस्थित नियोजन आणि व्यवस्थापनाने एका एकर मध्ये 100 टन उसाचे उत्पादन मिळवले आहे. यामुळे त्यांच्या या कष्टाचे कौतुक केले जात आहे.
लक्ष्मण सूळ यांची 31 एकर शेती आहे. ते या क्षेत्रामध्ये डाळिंब तसेच केळी या प्रकारचे पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. सध्या त्यांनी पाच एकर मध्ये सिताफळ तसेच दीड एकर क्षेत्रामध्ये केळी, सीताफळामध्ये पपई आणि डाळिंबात शेवग्याच्या आंतरपीक केलेले आहे.
तसेच ऊस हे त्यांचे मुख्य पीक असून 13 ते 14 एकर क्षेत्रावर त्यांचे ऊस पीक आहे. प्रगतिशील शेतकरी सुरेश कबाडे यांच्याकडून मार्गदर्शन व त्यांनी ऊस शेतीत केलेल्या प्रयोगांचा अवलंब करत त्यांनी उसाची शेती केली व 100 टन एका एकर मध्ये उसाचे उत्पादन मिळवले.
ते ऊसाच्या कांड्याऐवजी रोपांची लागवड करतात. रोप निर्मिती करिता एक गुंठे क्षेत्र निवडण्यात आले आहे. यामध्ये रासायनिक खते तसेच शेणखत व ह्युमिक ऍसिड यांचा वापर करून जमीन तयार केले जाते.
सुमारे 30 दिवसात रोप लागवडीसाठी या माध्यमातून तयार होते. लागवडी पूर्वी सेंद्रिय खत 200 किलो व लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी दुसरी मात्रा व सोबत सेंद्रिय खत 100 किलो, तिसरी मात्रा साठ ते सत्तर दिवसांनी व त्यासोबत 100 किलो सेंद्रिय खत व जेव्हा उसाची मोठी भरणी केली जाते तेव्हा चौथी मात्रा दिली जाते.
साखरेला चांगला दर मिळत असून ऊस उत्पादकांना 400 रुपये द्या, राजू शेट्टी यांची मागणी
दरम्यान, ते लागवडीचे अंतर हे पाच बाय दोन किंवा साडेपाच बाय दीड फूट ठेवतात. लागवडीसाठी उसाचा को 86032 हा वाण लागवडीसाठी वापरला जातो व आडसाली उसाची लागवड केली जाते.
न मागता निवडणूक निधी देणारा माझा जीवाभावाचा शेतकरी! रविकांत तुपकर यांची शेतकऱ्यांप्रती पोस्ट व्हायरल
Share your comments